पान:सभाशास्त्र.pdf/233

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र २२६ ~~- ~- संघकायत अयोग्य ठरतो. नियमांत राहूनही संघकार्याचा विचका तो करूं शकतो. कित्येक संस्थांचे नियमांत सभासद घेतांना या दृष्टीने काळजी घेतली जाते व अनुरूप असे नियम असतात. भाग विकत घेऊन जेथे सभासदत्वं मिळत अगर वर्गणी भरला की संस्थेत प्रवेश मिळतो, तेथे सभासदांची वृत्ति कोणी लक्षात घेत नाहीं, तथापि प्रवेश देतांना जरी कांहीं करता आले नाही तरी संघकार्यात अनुभव आल्यानंतर अयोग्य अगर संघविरोधी, संघाला अप्रतिष्ठा आणणारे वर्तन करणाच्या सभासदाला बाहेर घालविण्याची व्यवस्था असली पाहिजे. संघाने नियमांत वागणाच्या व्यक्तीला चिरडू नये, उलट व्यक्तीने नियमांचे सहाय्याने संघकार्य विघटित करू नये ही भावना असला पाहिजे, घटना ही कार्यात व्यवस्था उत्पन्न करण्यासाठी आहे, ती शस्त्र म्हणून वापरण्यासाठी नाही ही जाणीव आदर्श घटना असली तरी, केवळ तिच्या योगाने उत्पन्न होत नाहीं. सभासदांच्या शीलांवर व प्रवृत्तींवर हे अवलंबून आहे. सभासदांना प्रवेश देतांना अवश्य ती काळजी योग्य नियम करून घेतली पाहिजे. | संघाचे निर्णय सभासदांनीच घ्यावयाचे असतात. एकापेक्षा अनेक माणसांनीं निर्णय घ्यावयाचा म्हणजे बहुमताने हे उघड आहे. शक्य तितक समजुतीने व समन्वयाने घेऊनही सर्वपसंत निर्णय न झाल्यास बहुमतान निर्णय घेणे अपरिहार्य होते. बहुमत हा निर्णयाचा आधार जरी असला तरी कांहीं निर्णय केवळ नाममाल बहुमतावर अवलंबून नसावेत. साधारण व संघटनात्मक असे विषयांचे भाग पाडता येतील. जे विषये अगर बाबी संघाच्या मूलभूत अगर संघटनात्मक स्वरुपाच्या नाहीत त्या बाबतचे निर्णय सामान्य बहुमताने घेणे योग्य आहे. ज्या बाबी मूलगामी अगर संघटनात्मक स्वरुपाच्या आहेत त्याबाबत निर्णय विशिष्ट बहुमत असेल तरच तो विधियुक्त असावा. ध्येय अगर उद्देशांत बदल, सभासदत्वाचे पालतेत बदल, घटना म्हणून जा व्यवस्था आहे त्यांत बदल, वगैरे स्वरुपांचे बदल हे मौलिक व संघटनात्मक आहेत. हे बदल सामान्य बहुमताने होऊ नयेत, सर्व सभासदांच्या ३ अगर ४ बहुमताने व्हावेत. असले बदल करण्याची संधीही वाटेल त्या सभेत नसावी. योग्य नोटीस देऊन अगर खास सभा बोलावून असल्या गोष्टींचा विचार व्हावा. सर्थ म्हणजे समान हेतु असणारे लोकांनी एकत्र जमणे होय. म्हणून तेथ