पान:सभाशास्त्र.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र १६ من در سے ہے ریسی व सद्बुद्धीने सहन केल्याही जातात.” (Things are done every day in every part of the Kingdom without let or hindrance, which there is not and cannot be a legal right to do, and not infrequently are submitted to with a good grace, because they are in their nature incapable by whatever amount of user growing into a right. ) याच दृष्टीने सार्वजनिक मोकळ्या जागी होणा-या सभेकडे पाहण्यात येते. जागेच्या विशिष्ट हेतूचा विपर्यास जोपर्यंत होत नाहीं अगर तिचे विशिष्ट उपयोगास अडथळा उत्पन्न होत नाही, तोपर्यंत जनतेला सार्वजनिक सभेच्या कामासाठी तिचा उपयोग करू देण्यांत न्यायच आहे. स्थानिक स्वराज्यसंस्था अगर स्थानिक पोलिस अधिका-यांनी आपले नियम जनतेच्या सोयीचे व संरक्षणाचे दृष्टीनेच केले पाहिजेत. नियमांनी उपभोग नष्ट न होतां व्यवस्थित झाला पाहिजे. सभेतील शांतता व सुव्यवस्थाः- सभा ही विशिष्ट हेतूसाठी असते व तो साध्य होण्याचे दृष्टीने सभेत शांतता व सुव्यवस्था असणें अवश्य आहे. सभेतील व्यवस्था व शांतता ठेवण्याची जबाबदारी समाचालक, सभापति व सभासद यांचेवर आहे. सार्वजनिक सभेचे बाबतींत ही जोखीम व जबाबदारी विशेष आहे. सभेत माणसे एके ठिकाण जमतात ती विचार करण्यासाठी, ज्ञान मिळविण्यासाठी, मतप्रदर्शन करण्यासाठी; पण त्याऐवजी जर डोकी फुटू लागली, दगडफेक होऊ लागली, सभेचे रूपांतर जर दंगलीत होऊ लागले तर सभेचा हेतु विफल झाला, मौलिक हक्काचा विपर्यास झाला असे उघड होते, मारामारीने, केवळ शक्तीचे जोरावर निर्णय घेण्याचे क्षेत्र सभास्थान नव्हे; त्यासाठी आखाडे आहेत व रणमैदाने आहेत. सारासार विचार करून, युक्तिवाद करून मनुष्याने वागावे हा विश्वास व ही आशा सभा या कल्पनेत मूलभूत आहे. लोकशाही म्हणजे विचारविनिमय करून, नाना मते नाना अभिप्राय संकालत करून, त्यांचा समन्वय करून चालणारी राज्यव्यवस्था, विचारविनिमय हा या व्यवस्थेचा प्राण आहे, म्हणून त्याचे माध्यम जी सभा तिला महत्त्व आहे. विचारविनिमय योग्य रीतीने व्हावा यासाठी सभेत शांतता व सभासदांत सहिष्णुता ही अत्यंत अवश्य आहेत. सभेतील इष्टकार्याचा शांतता हा पाया आहे. शांतता नसेल तर सभा नाही, चर्चा नाहीं, विचारविनिमय नाहीं, कांहींही नाहीं.