पान:सभाशास्त्र.pdf/229

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र २२२ राहातो व विघटन झाले तरी रजिस्ट्रार त्याची व्यवस्था लावून सभासदांत तो वाटतो. इच्छासिद्ध संस्था अगर संघ नोंदलेला असो अगर नसो; त्याला घटना व नियम अवश्य आहेत. संघाचे श्रेष्ठत्व अगर कार्यक्षमता ही त्यांतील सभासदांचे शीलावर, लायकीवर अवलंबून असली तरी, अनुरूप व अनुकूल घटना नसेल तर, कार्यात अडचणी उत्पन्न होतात; विलंब लागतो. संघकार्यात संघर्ष नसावा. कली शिरून, पक्षद्वेष माज़न, संघाचा नाश होऊ नये म्हणून, सभासदांची संघनिष्ठा जशी जाज्वल्य व व्यक्तिनिरपेक्ष हवी तशी तिची घटना पण मतभेदाला वाव देऊन कायॆक्यता शक्य करणारी असावी. विचारविनिमयाचे द्वारे एकल येणारे इसम संघ असावा हे ठरवितात व विचारविनिमयाचे द्वारें संघाचे निर्णय घेतले जातात व विचारविनिमयाचा अतिरेक होऊन संघाचा विलय व विनाश होतो. उत्पात्त, स्थिति व लय या तिन्ही अवस्थेत विचारविनिमयाची साथ संघाला असते. म्हणून तविषयक नियमांना महत्त्व आहे. त्याचप्रमाणे विचारविनिमय उपलब्ध होण्यासाठी माणसे एकत्र आली पाहिजेत म्हणजे संघ हवा. एकाच वेळी एकत्र आली व निघून गेली तर ती एक सभा झाली व संपली. पण सतत काम करण्यासाठी संघ हे साधन निर्माण केल्यानंतर तविषयक नियम यांना महत्त्व येते. संधासाठी घटना हवी व त्याचे कार्य विचाराविनिमयाने होणार असल्यामुळे त्याबाबत योग्य ते नियम हवेत, विचारविनिमयाने निर्णय घेण्यासाठी संघाचे सभासद सभेत बसल्यानंतर कोणत्या पद्धतीने कार्य व्हावे याचा विचार मागील प्रकरणांत केला आहे. संघाला घटना अवश्य आहे; नाही तर त्याच कार्यात निश्चिात नाहीं, सुसंगतपणा नाहीं; व सभासदांत विश्वास व निष्ठाही राहाणार नाही. हे सर्व असावे म्हणून प्रत्येक संघाला कांहीं तरी घटना पाहिजे, कांहीं तरी नियम पाहिजेत. म्हणजे संघ में एक संघटन असले पाहिजे व त्यांतील प्रमुख गोष्टींचा विचार पुढे केला आहे. | ज्या विधिसिद्ध संस्था आहेत त्यांची घटना राज्यसत्तेचे कायद्याने मुक्रर केलेली असते. देशांतील मुख्य विधिमंडळ हे राज्याचें घटनेने अगर घटनाकायद्याने अस्तित्वांत येते. मतदार कोण होऊ शकतो, मतदारसंघाची विभागणा, उमेदवाराची लायकी, निवडणुकीची पद्धत, विधिमंडळांतील सभासदांची संख्या, अध्यक्षाची निवडणूक, कार्यक्षेत्राचा विचार, कार्यपद्धतीचा विचार