पान:सभाशास्त्र.pdf/226

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१९ संघतंत्र ••••, ४००० याची, हा उद्देश असतो; व्यवहार करून नफा मिळवावयाचा हा उद्देश तेथे नसतो. कांहींतून तर सभासदांची जबाबदारी जथीमथी असते. म्हणजे प्रत्येक सभासद सभासदाचे देण्याला जबाबदार असतो. तेथे सभासदांतील सहकार्य हैं मुख्य सूत्र आहे. सभासदांनी सहकार्याने जीवनांतील संकटें दूर करावीत व सोयी वाढवाव्यात, उत्कर्ष करून घ्यावी हा उद्देश असल्याने व तो संघ अगर संस्थेमार्फत साध्य होत असल्याने प्रत्येक सभासदाची जबाबदारी ही वैयक्तिक असते; व तिचे स्वरूप अधिक नौतिक असते. १९१२ च्या सहकारी कायद्याची रचना व त्याअन्वये काढलेले नियम या सर्वांच्यामागे हीच भूमिका आहे. सरकार में नियंत्रण कंपनीकायद्याखालीं करते त्यापेक्षा अधिक नियंत्रण सहकारी संस्थांचे बाबतींत असते, पण त्याचबरोबर अधिक सवलती पण देते. त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्गदर्शनही अनेक प्रसंगी सरकार करते, त्यांचा कारभार सोपा व व्यवस्थित व्हावा म्हणून तपासणी व सूचना या गोष्टी सरकारतर्फे नित्य केल्या जातात. सहकारी संस्थेचा जसा उद्देश असेल त्याला अनुसरून घटनेचे व नियमांचे नमुने तयार केलेले असतात. घटना व नियम हे जरी संस्थेच्या सभासदांनी करावयाचे असले तरी, बहुशः ते सरकारी नमुन्याबरहुकूम केले जातात. उत्कृष्ट घटना अगर आदर्श नियम असूनसुद्धा या संस्था यशस्वी झाल्या आहेत असा अनुभव या देशांत अद्याप म्हणावा तितका आला नाही. व्याकरणदृष्ट्या शुद्ध व निर्दोष असलेले वाक्य अर्थशून्य असू शकते तसेच अगदीं नियमानुसार संस्था चालून निष्प्रभ व निःसत्व ती असू शकते. प्रत्येक संस्था ज्या उद्देशाने व ज्या कार्यासाठी काढली असेल तिला अनुरूप असा भाव जर सभासदांत नसेल तर ती संस्था घटनेत निर्दोष असली, कार्यपद्धतींत नियमबद्ध असली, तरी प्रभावी ठरणार नाही. प्रत्येक संस्थेच्या कार्यावरून एक परंपरा उत्पन्न होते, एक तिचे असे अध्यात्म निर्माण होते व त्याची जोपासना सभासदांनी न केली तर ती संस्था नेस्तनाबूद होते. घटनेने संस्थेचा सांगाडा निर्माण होईल, त्या मागील प्राण व प्रभाव हे सभासद ज्या भावाने व ज्या भावनेने संस्थेशी संबंध ठेवतात त्यावर अवलंबून आहे. संस्थेचा जो भाव त्याला विसंगत अगर विरोधी वातावरण उत्पन्न झाले म्हणजे, संस्था संपुष्टांत येते अथवा कार्यशून्य होते. आर्थिक नफ्यासाठी काढलेल्या संस्थेत राजकारण शिरलें, सहकारी संस्थेत व्यक्तिनिष्ठ भाव शिरला, म्हणजे त्या त्या संस्था