पान:सभाशास्त्र.pdf/225

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र २१८ इच्छासिद्ध संस्थांतून सभासदांनी विशेष जबादारीने वागावें. कारण त्यांच्या निर्णयांत व नियसनांत प्रत्येक सभासदाचा भाग असतो. त्या संस्थेची पत, प्रतिष्ठा व लौकिक उभारण्यांत त्याचा भाग असतो. व्यापारी कंपन्या बहुशः मर्यादित जबाबदारीच्या व नफ्यासाठी असल्यामुळे भागीदारांत व जेथे ते हजारोंनी असतात तेथे संघभाव क्वचितच असतो. क्लवाचा अभिमान, राजकीय पक्षाचा अभिमान जसा सभासदांत दिसून येतो, तसा कंपनीच्या भागीदारांत कंपनीबद्दलचा अभिमान दिसून येत नाही. नफ्याचे दृष्टीने भाग घेणे व विकणे यांत अभिमानाचा, भावनेचा प्रश्नच येत नाही. तीच स्थिति विमाव्यवहार करणाच्या कंपन्यांत असते. विमाकंपन्यांचे भागीदार, भागांवर नफा किती पडेल याकडे पाहातात, तर पॉलिसीवाले एकंदर विमाकंपनीचा कारभार कसा चालला आहे याकडे पाहातात. एका शब्दांत दोन्ही पक्ष आर्थिक दृष्टीनेच कंपनीचे व्यवहाराकडे लक्ष देतात. थोड्याबहुत प्रमाणाने हीच परिस्थिति सहकारी संस्थांतून दिसून येते, तेथेही आर्थिक दृष्टीच प्रभावी होते. म्हणून ज्या इच्छासिद्ध संस्थांतून आर्थिक व्यवहार होतो त्यांतील सभासदांनीं त्या दृष्टीने दक्ष राहून संस्थेची पत व पैसा राखला पाहिजे. त्यांच्याच सहकार्याने दोन्ही उभारली जातात, टिकतात व वाढतात.भागीदारांच्या सभेतील बेजबाबदार वर्तनाने अनेक बँका, विमाकंपन्या, सहकारी संस्था संकटांत आल्याची उदाहरणे घडली आहेत. भागीदार व संचालक मंडळ यांच्यांतील विरोध, तसेच पक्षबाजी यांचा अतिरेक होऊन, कोर्टकचेच्या होऊन, पत व पैसा धुळीला मिळाला असेही अनेक ठिकाणी झाले आहे. संस्थेची घटना कितीही दक्षतेने केली, सभासंचालनही जरी चांगलें झालें, तरी जॉपर्यंत सभासद व्यक्तिशः आपली जबाबदारी ओळखत नाही, तोपर्यंत संस्थेचे नुकसान निय मांत राहून तो करू शकतो. नोंदणीमुळे जें सरकारी कायद्याचे बंधन प्राप्त होते त्याने नुकसानीला आळा बसतो हे खरे, पण नोंदणीने नुकसान टळत असे मात्र नाहीं, अगर नोंदणीने कारभार यशस्वी अगर कार्यक्षम होतो असेही नाहीं. सहकारी संस्थांत सभासदांवर अधिक जबाबदारी असते. त्यांचे भांडवल हे त्यांच्या पतीवर उभारलेले असते. सभासद हे तेथे गरजू असतात, व्याज़ नसतात; म्हणजे रक्कम गुंतवावयाची म्हणून भाग खरेदी घेतले जात नाहीत. सहकार्याने भांडवल उभारावयाचे, सोई करून घ्यावयाच्या, गरज भागवाव