पान:सभाशास्त्र.pdf/222

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१५ संवतंत्र ••••••••• मदत करणा-या, शास्त्र, कला, साहित्य यांच्या उन्नतीसाठी झटणा-या, ज्ञानप्रसार करणाच्या संस्था, तसेच ग्रंथालये, वाचनालये, सार्वजनिक पदार्थसंग्रहालये, सार्वजनिक चित्रगृहे, कलागृहे, तसेच यांतिक शोधार्थ निघालेल्या संस्था, नोंदतां येतात. रजिस्ट्रार अगर नोंदणीदार यांजकडे उद्देशपत्रिका ( Memorandum ) द्यावी लागते. तींत (१) संस्थेचे नांव (२) स्थापण्याचा उद्देश (३) संस्थेचे नियमाप्रमाणे जें कार्यकारी अगर व्यवस्थापक मंडळ असेल त्यांतील सभासदांची नांवे, धंदे व पत्ते द्यावे लागतात. त्याचप्रमाणे संस्थेच्या नियमांची प्रत द्यावी लागते. उद्देशपत्रिकेवर व्यवस्थापक मंडळापैकी निदान तीन सभासदांच्या सह्या लागतात. नोंदणी-फी दिल्यानंतर नोंदणीदार नोंदणी झाल्याबद्दल सर्टफिकिट अगर प्रमाणपत्र देतो. संस्थेचे उद्देश सदर्दू कायद्याचे मर्यादेत राहून सभासदांना कमी जास्त करता येतील. कायद्यांत सांगितलेल्या उद्देशाबाहेर स्वरूप बदलता येणार नाही, तसे केल्यास प्रमाणपत्र रद्द होईल. कायद्यांत राहून उद्देश बदलता येईल अगर समान उद्देशाच्या अन्य संस्थांना सामील करून घेता येईल. हे करण्यासाठी ठरविलेली योजना सर्व सभासदांना वांटून नियमाप्रमाणे खास सभा बोलावून पास करून घ्यावी लागते. व ती नुसती पास होऊन भागत नाही, तर उपस्थित सभासदांपैकी ३ सभासदांनी अगर तितक्या मतांनी, जर अधिकारपलाने मते आली असतील तर पास व्हावी लागते व हा निर्णय पुन्हा तितक्याच मताधिक्याने दुसन्या खास सभेत कायम व्हावा लागतो. अशा रीतीने तो कायम झाला तर नोंदणीदार त्याला मान्यता देतो. नोंदलेल्या संस्थेला संस्थेच्या नांवानें कोर्टात दावे आणतां येतात; तसेच संस्थेविरुद्ध दावे आणतां येतात व संस्थेची मालमत्ता जप्त करता येते. जेथे संस्था नोंदली नसेल तेथे संस्थेच्या अधिका-यांचे खाजगी मिळकतीवर बजावणी करता येते. शिवाय सर्व सभासदांना पक्षकार करावें लागते व ते व्यक्तिशः जबाबदार ठरतात. नोंदली असेल तर नियमाप्रमाणे जो आधिकारी असेल त्याने संस्थेचे वतीने कोर्टदरबार करावा व त्याविरुद्ध कोर्टदरबार होतो, व संस्थेची मिळकतच फक्त जबाबदार असते. संस्था बंद करावयाची असेल तर ३ पेक्षा अधिक सभासदांची संमति हवी. संस्थेचे विघटन (Dissolution ) होतांच संस्थेच्या मिळकतीची वासलात नियमाप्रमाणे लागली पाहिजे. नियम नसतील तर व्यवस्थापक-कामटी योग्य ती वासलात लावील, तंटा उत्पन्न झाल्यास दिवाणी कोर्टाकडे प्रकरण निकाला