पान:सभाशास्त्र.pdf/220

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१३ संघतंत्र २३/ १ २ /२,०० ५०-२००० . याचे उलट ज्या इच्छासिद्ध संस्था असतात त्यांची स्थिति असते. खाजगी व्यक्ति एकत्र जमून विचार करून त्या अस्तित्वांत आणतात, “भाडेकरी संघ' कायद्याने अस्तित्वात आला नाहीं. चार भाडेकरी जमले व हितसंरक्षणाचे दृष्टीने त्यांनी संघ स्थापला. “आर्य क्रीडामंडळ' खाजगी व्यक्तींनीच अस्तित्वात आणले. शिक्षण प्रसारक मंडळ' खाजगी व्यक्तींनींच निर्माण केले, तंबाखू कामगार संघ' त्याच पद्धतीने निर्माण झाला. ‘हिंदुमहासभा’ ‘मुस्लिम लीग' अगर ‘राष्ट्रीयसभा' याच पद्धतीने जन्मास आल्या. व्यापार, उद्योग, विमा व अन्य व्यवहारक्षेत्रात काम करणाच्या संस्था, या सर्व खाजगी व्यक्ति जन्मास घालीत असतात. खाजगी व्यक्तींच्या इच्छेने त्या सिद्ध होतात म्हणून त्या इच्छासिद्ध संस्था होत. समाजांत एकत्र येऊन काम करण्याचा हक्क म्हणजे संघस्वातंत्र्याचा हक्क होय. जोपर्यंत संघाचा हेतु प्रचलित कायद्याविरुद्ध नाहीं, अगर जोपर्यंत तो सफल करून घेण्यासाठी संघ बेकायदेशीर मार्गाचा स्वीकार करीत नाही तोपर्यंत, संघाचे कार्यात राज्यसत्ता अडथळा आणीत नाहीं; निदान तिने आणू नये, हा लोकशाहीचा एक प्रमुख संकेत आहे. इच्छासिद्ध संस्था अगर संघ यांना सवलती मिळाव्यात त्यांच्या कार्याला उत्तेजन मिळावें. त्यांना प्रतिष्ठा यावी, त्या कार्यक्षम व्हाव्यात, त्यांच्यांत नियमबद्धता यावी, म्हणून राज्यसत्ता कायदे करते. ज्याप्रमाणे सभा म्हणजे निदान दोन माणसे अवश्य आहेत, तसे संघ यांत दोन माणसांची जरूर आहे. एकत्र येण्यासाठी एकापेक्षा अधिल व्यक्ति असल्याच पाहिजेत. एकत्र यावयाचे, विचार करावयाचा व एखादं कार्य अगर हेतु मनांत धरून तो साध्य करण्याचा सतत प्रयत्न करण्यासाठी साधन उत्पन्न करावयाचे म्हणजे संघ स्थापावयाचा. जे संघांत येतील ते हा हेतु मान्य करूनच येतील. किंबहुना हेतुमान्यता असेल तरच संघांत प्रवेश असतो. समान हेतु आहे म्हणून संघ सिद्ध झाला व तो असेल तोपर्यंत सभासदाचे सभासदत्व नैतिकदृष्ट्या सिद्ध ठरते. कशासाठी एकत्र आलों हे नित्य डोळ्यांपुढे पाहिजे. होत असलेले कार्य त्या हेतूशीं पडताळून पाहिले पाहिजे, स्वीकारलेला मार्ग, तो हेतु साध्य करणारा असला पाहिजे. हे पाहणे सुकर व्हावे म्हणून संघाला घटना पाहिजे, नियम पाहिजेत. घटना अगर नियम म्हणजे सभासदांचे व संघाचे आपआपसांतील व परस्परांतील संबंध निश्चित करणारे साधन होय. ही घटना अगर हे नियम करण्याचा अधिकार