पान:सभाशास्त्र.pdf/218

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१ १ संघतंत्र

=""--

  • * * * *-*

- इच्छा धरते, म्हणजेच ती व्यक्ति चार-चौघे जमवून विचारविनिमय करते. भाषणस्वातंत्र्य आहे, पण माणसे एकत्र येण्याचा हक्क नसेल तर ते अर्थशून्य आहे. भाषणस्वातंत्र्य हैं जमावांतच वापरले जाते. मग तो जमाव अगर सभा दोन माणसांची का असेना; एकत्र येण्याचा हक्क अगर जमावाने काम करण्याचा हक्क, भाषणस्वातंत्र्याला आवश्यक आहे. तसेच एकत्र येण्याचा हक्क म्हणजे जी गोष्ट एका व्यक्तीला करितां येते ती अनेकांचे साहाय्याने संघटितपणे करण्याचा हक्क आणि हा हवा उपभोगण्यासाठी भाषणस्वातंत्र्याची पण आवश्यकता आहे. एकल यावयाचे पण बोलण्याचा हक्क नाहीं, तर हा एकत्र येण्याचा हक्क अर्थशून्य आहे. माणसे एकत्र आली म्हणजे विचारविनिमय करून निर्णय घेत असतात. एकत्र येणे व संघटितपणे काम करणे म्हणजे त्यांत नियमबद्धता पाहिजे. व्यक्तीला आपले जीवन व्यापक व्हावे, विकसित व्हावें । म्हणून संघजीवनाची ओढ असते. संघांत येण्याने, थोडे बंधन असले तरी ते दूषण न ठरतां भूषणच ठरते. मनुष्य समाजांत येण्याने रतिभर स्वातंत्र्य घालवितो पण राहिलेले खंडीभर सुरक्षित ठेवतो. संघांत येण्याने संघशः कार्य करण्याने मनुष्यास नियमानुसार वागावे लागते; पण त्या मोबदल्यात त्याचे उन्नतीचे दृष्टीने त्याला फायदाच होतो. संघांत त्याची शक्ति अनेक पटीने वाढते, संधि दुणावते, कार्यक्षेत्र व्यापक होते व गुणविकासालाही योग्य वातावरण मिळते. कलियुगीं संघशक्ति श्रेष्ठ; पण संघांत कलि शिरणे हेही तितकेंच अनिष्ट असते व अनुभवही तसाच आहे. म्हणून संघानें काम करतांना काय गोष्टी ध्यानात ठेवाव्यात याचा विचार करणे अवश्य आहे. मनुष्य हा संगतिप्रिय आहे, संघप्रवृत्त आहे. म्हणून संघविषयक विचार महत्त्वाचा आहे व तेथेही विचारविनिमय हेच निर्णयाचे माध्यम असल्यामुळे सभाशास्त्राचे दृष्टीनेही तो प्रस्तुत ठरतो. * समाजांत नाना त-हेचे नाना हेतु सफल करण्याचे हेतूने संघ कार्य करीत असतात, ढोबळमानाने त्यांचे वर्गीकरण विधिसिद्ध व इच्छासिद्ध असे करता येईल, संघटित रीतीने एकापेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन सतत कार्य करणे म्हणजे संघ करून काम करणे होय. समाजाचे नियमन व नियंत्रण हैं। राज्यसत्तेमार्फत होत असते. हे नियमन व नियंत्रणतंत्र रचण्यांत जेथे लोकशाही दृष्टि ठेवली जाते तेथे नियमनांत अगर राज्यकारभारांत लोकांचे ऐकलें जाते, लोकांच्या सहकार्याने तो चालतो, लोकच प्रतिनिधिद्वारा तो चालवीत