पान:सभाशास्त्र.pdf/217

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र २१० पाहिजे, निर्णय विचारविनिमय करून घेतले पाहिजेत. सभासदांत कागदपत्र फिरवून सभा न भरवितां निर्णय घेणें हें अयोग्य व अनिष्ट आहे. तसेच निर्णय घेऊन मागाहून संमति घेणे हेही अनिष्ट व अयोग्य आहे. या प्रथेनें सभासदांवर दाब व अयोग्य वजन पडते. फिरते काढून (Circular ) निर्णय ठरविणे काही संस्थांच्या नियमांत विधियुक्त मानले आहे. सभेचा निर्णय हो विचारविनिमयानंतर झाला पाहिजे; तो होऊन झाला पाहिजे. विचारविनिमय हा रूबरू असेल, प्रत्यक्ष असेल, तेव्हांच तो विचारविनिमय होय. लेखी मते, मागवून विचारविनिमय होत नाही. आधी निर्णय घेऊन मग चर्चा करणे हाही चुकीचा क्रम आहे. समाविषयक तत्त्वज्ञानाला हे सर्व विसंगत आहे. अपवादप्रसंगांच वरील नियम क्षम्य ठरतो. उपसमिति–उपसमित्यांच्या सभांना वरील तत्वें लागू आहेत. जेथे उपसमिति एकाच सभासदाची आहे तेथे सभासंचालनाचा प्रश्नच येत नाहीं. उपसमिति समितीला रिपोर्ट करते व त्यानंतर तिचे अस्तित्व संपते. समितीचे अस्तित्व संपलें तर उपसमितीचेही आपोआप संपतं. संघतंत्र पार्वजनिक सभा यासंबंधीचा प्रपंच पहिल्या भागांत केला व संघटित

  • संस्थांच्या सभांचा विचार विस्तारशः दुसन्या भागांत केला. यानंतर सभानियमन अगर सभासंचालन यासंबंधी अधिक विचार करण्याचे काही राहिले नाही. तथापि, संघटित संस्था यासंबंधी थोडक्यांत विचार करणे जरूर आहे. भाषणस्वातंत्र्य व संघस्वातंत्र्य ही एकाच अधिकाराची दोन स्वरूपे आहेत. व्यक्तीला जे वाटते, तिचा जो अनुभव व अभिप्राय आहे तो बोलून दाखविण्यास तिला अधिकार असला पाहिजे; या हक्काशिवाय व्यक्ति विकास नाहीं, व्यक्ति कांहीं आपली मते, आपले अभिप्राय बंदिस्त खोलीत

आत्मगत भाषण करून मांडीत नाहीं, अन्य व्यक्तींजवळ ती मांडू इच्छिते. अन्य व्यक्तींच्या अनुभवाशी तुलना करू इच्छिते, त्यांचे दृष्टिकोन समजून घेण्याचा