पान:सभाशास्त्र.pdf/216

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०९ सभानियमन व संचालन ~~ समित्या यांतील सभासदांना आपआपले मत, कारणे देऊन रिपोर्टात नमूद करता येते. चौकशी संपली म्हणजे झालेल्या चौकशीवर सभासद चर्चा करतात. मुख्य मुख्य मुद्द्यांवर एकमत असेल तर सर्व रिपोर्ट लिहिण्याचे कार्य एका अगर दोघां सभासदांवर अगर चिटणिसावर सोंपवितात. घेतलेल्या निर्णयानुसार रिपोर्ट लिहिला जातो व तो समितीपुढे ठेवला जातो. तो मान्य झाल्यास प्रश्नच मिटला. परंतु पुष्कळ वेळां सामान्य मान्यता देऊन अनेक सभासद भिन्नमतपत्रिकाही जोडतात. जेव्हां मतभेद तीव्र असेल तेव्हां निरनिराळ्या मतांचे सभासद आपआपले प्राथमिक रिपोर्ट तयार करतात व विषयवार, परिच्छेदवार चर्चा होऊन निर्णय घेण्यात येतात व जो व जसा रिपोर्ट बहुमतानें पास होईल तसा रिपोर्ट समिति करते. भिन्नमतपत्रिकाही जोडल्या जातात. समितींत स्वीकारलेली विचारसरणी नैतिक दृष्टीने महामंडळाचे सभेत सभासदानें कायम ठेवावी असे अपेक्षिले जाते. एकमताने रिपोर्ट असेल तर तो करणा-यांनी त्याला मोठ्या सभेत पाठिंबा द्यावा असा संकेत आहे. आदेशाबाहेर समितीला जातां येत नाही. महामंडळाने कांहीं निर्णय घेऊन, कांहीं तवें मान्य करून जेथे समिति नेमली असेल तेथे समितीला ते निर्णय अगर ती तत्त्वे अमान्य करून शिफारशी करण्याचा अधिकार नाहीं. मूलग्रांही फरक जेथे केले जातात तेथे त्या रिपोटॉवर पुन्हा तपशीलवार चर्चा होऊन पुन्हा तो प्रश्न नवीन ठरावाप्रमाणे कमिटीकडे सोपविला जातो. प्रश्नासाठी नेमलेली समिति त्यावर रिपोर्ट केल्यानंतर कृतकार्य होते. नंतर तिला अस्तित्व नसते, रिपोर्ट प्रसिद्ध होईपर्यंत अगर महामंडळाचे समेपुढे मांडला जाईपर्यंत, समितीच्या सभासदांनी त्याला प्रसिद्ध देणे अगर त्यांतील निर्णयाला प्रसिद्ध देणे, गैर मानले जाते. नियमानुसार अस्तित्वात आलेल्या समित्या नियमाप्रमाणे अस्तित्वांत राहातात. तात्पर्य, सामित्यांचे अधिकार मुख्य संस्था ठरविते व कार्याच्या स्वरुपाप्रमाणे ते अधिकार असावे लागतात. समाविषयक नियम व सभासंचालनविषयक नियम हे सर्वसामान्य सभांना जे लागू असतील तेच तारतम्याने समित्यांचे सभेला लागू पडतात, सामित्यांचे सभेतील काम अनौपचारिक वातावरणांत सामान्यतः होते, म्हणून संचालनांत जो बदल होतो त्याचा निर्देश वर केलाच आहे. अनौपचारिक वातावरण असले तरी सर्व चर्चा सभा भरून झाली स...१४