पान:सभाशास्त्र.pdf/215

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र २ ०८ ހހހހހހހހރހޅއގދތރގއގދ،

•••••••••••••••• त्याप्रमाणे झाले पाहिजे. समितीतील वातावरण औपचारिक नसलेमुळे सभासंचालनांत माल थोडा फरक पडतो. सभासद बसून बोलतात. चहापान, धूम्रपानही अयोग्य मानले जात नाही. सूचना अगर उपसूचना यांना अनुमोदनाची जरूर नाहीं. एकदांच बोलावें हाही नियम तेथे लागू नसतो. प्रत्येकाचे मत प्रत्येकाला समजून येण्यासाठी शक्य ती संधि प्रत्येकाला दिली जाते. तसेच विषयाचा क्रमही सभासदांचे सोयीप्रमाणे ठरविला जातो. योग्य कारणासाठी चर्चातहकुबी मांडतां येते. पण कालहरण करणारी सूचना अग्राह्य ठरविली जाते. पोलचा प्रश्नच उत्पन्न होत नाहीं. अध्यक्षाला संचालनाला अवश्य ते सर्व अधिकार असतात. असभ्य वर्तन करणारास, दंगा करणारात तो बाहेर घालवू शकतो. चर्चाबंदीची सूचना आणतां येते व अध्यक्ष पुरेशी चर्चा झाल्यास ती स्वीकारतो. साधारणपणे अध्यक्ष स्थानापन्न होतांच काम कसे होईल, कोणत्या क्रमाने होईल याची दिशा सांगतो व त्याला सभेची अनुमति मिळवतो. सभेपुढील प्रश्न रीतसर चर्चेला घातल्यानंतर तत्संबंधी कोणास माहिती पाहिजे असेल, कांहीं शंका असतील, प्रश्न विचारावयाचे असतील तर ते विचारण्यास परवानगी असते. योग्य ती माहिती देण्यास अध्यक्ष सांगतो अगर व्यवस्था करतो. नंतर प्रत्येक सभासदाला काय सांगावयाचे आहे ते सांगण्यास पाचारण करतो. याप्रमाणे सर्वांना संधि दिल्यानंतर जरूर पडल्यास आणखी कोणास बोलावयाचे असल्यास त्यांना पुन्हा संधि देतो. समन्वय करण्याच्या प्रयत्नांना उत्तेजन देतो; नाहीं तर प्रत्येक सभासदाचे मत घेऊन निर्णय घेतो. | जेथे समिति कार्यकारी ( Executive ) आहे तेथे निर्णय हा सर्वांचा समजला जातो व त्याविरुद्ध मत देणाच्या सभासदावरही त्याची जबाबदारी येते. महामंडळाचे सभेत त्याविरुद्ध तो बोलू शकत नाहीं. बजावणीचे काम एकमुखी असले पाहिजे. कार्यकारीचे चार सभासद चार तोंडांनी बोलू लागतील तर कार्य होणारच नाही. त्यांनी बहुमताचा निर्णय मानावा अगर त्यागपत्र देऊन बाहेर पडावे असा संकेत आहे. जेथे समितीचे स्वरूप अन्य प्रकारचे आहे तेथे प्रत्येक सभासद आपली भिन्न मतपत्रिका जोडू शकतो. न्यायदानी (Judicial ) स्वरुपाची समिति असेल तर बहुमताचा निर्णय हा विधियुक्त खरा, तथापि तो मान्य नसणारा सभासद निकालपत्रांत आपले भिन्न मत नोंदवू शकतो व कारणेही देऊ शकतो. निवडक समित्या, चौकशी