पान:सभाशास्त्र.pdf/214

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

*-*-*-*-* २०७ सभानियमन व संचालन wwwwwwwwwwwwwwww घालून पुन्हा त्याच समितीला काम करण्यास सांगता येते. समितीचा रिपोर्ट महामंडळाचे सभेत चर्चेला आला असतां तो मान्य होईल अगर अमान्य होईल, अगर अपुरा अगर दोघास्पद वाटल्यास ‘फेरविचारार्थ समितीकडे पाठवावा' असाही निर्णय होईल. झालेली चर्चा लक्षांत घेऊन तसेच अधिक आदेश देऊन त्याच समितीला पुन्हा काम करण्यास अनेक प्रसंग सांगितले जाते. नेमलेल्या अगर नियमानुसार आस्तत्वात आलेल्या समितीला तिला नेमून दिलेल्या कार्याचे दृष्टीने जरूर ते अधिकार दिले जातात अगर असतात. संस्थेचे कागदपत्र पाहणे, अन्य कागदपत्र मिळविणे, जरूर तो साक्षीपुरावा घेणे, जरूर त्या ठिकाणी जाऊन निरीक्षण अगर पाहणी करणे, हे सर्व जेथे प्रस्तुत व अवश्य असेल तेथे करण्याचा अधिकार समितीला असतो. समितींतील काम हे अनौपचारिक वातावरणांत चालते. सभासदाव्यातरिक्त हजर राहण्याचा अधिकार सामान्यतः कोणालाही नसतो. संस्थेचा सभासद आहे, पण समितीचा नाहीं या परिस्थितींत समितीच्या सभेला हजर राहण्याचा अधिकार त्याला प्राप्त होत नाही. कॉमन्स सभेच्या कांहीं समित्यांच्या सभेला तिचे सभासदांव्यतिरिक्त सभासदांना हजर राहण्याचा अधिकार आहे, पण तोही विवक्षित मर्यादेपर्यंतच आहे. ज्या वेळेला समिति निर्णय घेण्यास बसते त्या वेळी हा अधिकार नसतो. तसेच समिति साक्षीपुरावा घेत असेल त्या वेळी विशिष्ट प्रसंग सोडून अन्य सभासदांना हजर राहण्याचा अधिकार आहे. समितीचे कार्य प्रकटपणे व्हावे असा आदेश नसेल अगर नियम नसेल तर ते तसे न होणे इष्ट आहे. जेथे साक्षीपुरावा वगैरेचा प्रश्न नाहीं तेथे प्रकट सभा करण्याचे कारण नाहीं. सभेतील चर्चा ही अनौपचारिक व मोकळे मनाने केली जाते व ते होणे इष्ट आहे, म्हणून झालेल्या चर्चेचे टिपण ठेवण्यात येत नाही. फक्त निर्णय नोंदले जातात. समितीचे सभेमध्ये केलेले विधान अगर मांडलेली विचारसरणी अमक्याची अमुक होती हैं जर तिच्या अधिकृत रिपोटत नसेल तर महामंडळाचे सभेत सांगता येणार ना। असा उल्लेख अयोग्य व समानीतीविरुद्ध मानला जातो. समितिसंचालनः-- समितीची सभा योग्य नोटिशीने काढणे जरूर आहे. कार्यक्रमपलिकाही त्यासोबत द्यावी हे इष्ट होय, स्थळ व काळ सभासदांना सोयीचा ठेवणे अवश्य असते. एतद्दविषयक नियम असतील तेथे