पान:सभाशास्त्र.pdf/212

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

مي مرمي مرمي م. ع م . هي مو بی مهر، همین •••••••••• २०५ सभानियमन व संचालन ••••••••••• अगर अन्य रीतीनें वृत्तान्ताचा विपर्यास करणे यांमुळे प्रसिद्धी ही असत् भावनेने अगर दुष्ट बुद्धीने केली आहे असे ठरते व त्यामुळे ती गुन्हाही ठरते. | वृत्तान्तः–सभेतील होणाच्या कार्याची नोंद करून घेण्यासाठी, चर्चेची टिपणे करण्यासाठी, निर्णयाची नोंद करण्यासाठी अधिकृत अशी व्यवस्था सर्वत्र असते. जें जें घडेल ते संपूर्णपणे विधिमंडळांतून लघुलेखक टिपून घेतात. वक्त्याचे भाषणाची कच्ची प्रत त्याचेकडे धाडण्यांत येते. व्याकरणाचे चुकीचे दुरुस्तीशिवाय त्यांत बदल करता येत नाहीं, न बोललेले घालतां येत नाहीं अगर बोललेले कमी करता येत नाहीं अगर त्यांत बदलही करता येत नाहीं. ठराविक मुदतीत सभासदाने प्रत दुरुस्त करून न धाडल्यास लघुलेखकाची प्रत अधिकृत वृत्तान्तांत छापली जाते. विधिमंडळाव्यतिरिक्त संस्थांच्या समांतून सर्वसामान्यपणे चर्चेचा सारांश व झालेले निर्णय पूर्णपणे टिपून घेण्याची व्यवस्था असते. काही संस्थांतून वृत्तान्ताची टिपणे मंजुरीपूर्वी सभासदांना वाटली जातात. मंजुरीचे वेळीं काय. दुरुस्ती करता येते याचे विवेचन पूर्वीच केले आहे. अनेक संस्था झालेल्या कार्याचा अधिकृत वृत्तान्त प्रसिद्धीसाठी वृत्तपत्रांकडे धाडतात अगर स्वतः प्रसिद्ध करितात. प्रसिद्धीला देण्यापूर्वी तो अध्यक्षाला दाखविणे जरूर असते. येथपर्यंत संस्थेच्या सर्व सभासदांच्या सभांचा विचार केला. वरील विवेचनांतील तत्त्वे, परिषदा, विषयनियामकसमिति, जाहीर अधिवेशने वगैरेंनाही लागू आहेत. मागे सांगितल्याप्रमाणे प्रत्येक संस्थेत कार्य करणारे एक लहान मंडळ असते. सर्व सभासद कांहीं दैनंदिन कार्य करू शकत नाहींत. विधिमंडळे कायदे करतील, पण अंमलबजावणीचे काम पाहणारें मंत्रिमंडळ असते अगर सरकार म्हणून असते. नगरपालिकेतून, लोकलबोडंतून स्थायीसमिति अगर व्यवस्थापक मंडळ असते. व्यापारी कंपन्यांतून संचालकमंडळे असतात. तात्पर्य, सर्व सभासदांनी झालेले जे संस्थेचे स्वरूप व ज्याला महामंडळ (Generat body ) म्हणता येईल, त्याच्या सभा या सर्वाधिकारी असतात व त्याचे निर्णय अमलात आणणारे लहानसे आटोपशीर मंडळ असते. त्याची जबाबदारी बजावणीचे स्वरुपाची असते. या मंडळांतील अगर समितींतील कामही विचारविनिमयाने चालते. तसेच निरनिराळ्या प्रसंगी निरनिराळ्या कार्याकरितां संस्थांना काम करण्यासाठी थोड्या सभासदांच्या समित्या नेमाव्या