पान:सभाशास्त्र.pdf/211

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

साशास्त्र २०४ ހކރވނވފއ. वर्ग यांनी करावयाचे आहे. अध्यक्षाने बोलाविल्याशिवाय पोलिसांस आंत येण्याचा व बंदोबस्त करण्याचा अधिकार नाही. जेथे दंगा झाला अगर दंगा होण्याचा निश्चित संभव आहे याची खात्री असेल तर पोलीस आंत प्रवेश करू शकतात. अन्य प्रसंगी अध्यक्षाची परवानगी अवश्य आहे. सभास्थानाबाहेर ये जानियंत्रण करण्यासाठी पोलिसांना जो कायद्याप्रमाणे अधिकार असेल तेवढाच त्यांनी वापरला पाहिजे. नगरपालिकेचे कचेरीबाहेर भले पोलीस असोत, पण अध्यक्ष बोलावीपर्यंत, अगर प्रत्यक्ष दंगा होईपर्यंत, अगर नक्की तो टळत नाही अशी खात्री वाटेपर्यंत, त्यांना आपण होऊन आत येतां येणार नाहीं. अन्य इच्छासिद्ध संस्थेच्या सभेलासुद्धा याच मर्यादा लागू आहेत. जर सभा प्रकट असेल व प्रेक्षक हजर असतील तर त्यांचे सभास्थानांतील नियंत्रण करण्याचा अधिकार अध्यक्षाला आहे. अयोग्य वर्तन करणारास बाहेर घालविण्याचा व न गेल्यास जरूर तितक्या शक्तीचा उपयोग करून बाहेर घालविण्याचा हक्क अध्यक्षाला आहे. सभास्थानांत अगर अधिवेशनाचे ‘नगरात बंदोबस्त ठेवण्याचा अधिकार संस्थेचा आहे. पोलिसांना बोलाविल्याशिवाय आंत जाता येणार नाही. अर्थात् जेथे दंगा झाला असेल अगर तो होणे अटळ आहे अशी खात्री झाली असेल तेथे ते जाऊ शकतात व शांततेच्या दृष्टीने सभागृहाचा ताबाही घेऊ शकतात. अन्य प्रसंगी त्यांना आंत जाण्याचा अधिकार नाही. आंतील व्यवस्था व नियंत्रण हीं सर्वस्वी संस्थेच्या अधिकारांतील बाब आहे. अध्यक्ष ठरवील तेव्हां अगर सभा ठरवील तेव्हां प्रेक्षकांनी बाहेर गेले पाहिजे. त्यांनी कोठे वसावे, कसे वागावें, प्रवेश कोठून करावा वगैरे सर्व बाबतींत नियम व नियंत्रण करण्याचा अधिकार संस्थेचा आहे. जेथे गुप्त सभा व्हावी असे ठरेल तेथे प्रेक्षकांबरोबर वृत्तपत्रांच्या बातमीदारांनाही बाहेर जावे लागते. - बातमीदारः–जेव्हां प्रेक्षकांना हजर राहण्याचा अधिकार असतो तेव्हा वृत्तपत्रांच्या बातमीदारांनाही तो मिळतो व सभेतील वृत्तांत प्रसिद्ध करण्याचा अधिकार या परिस्थितीत प्राप्त होतो. प्रसिद्ध केलेला वृत्तान्त यथातथ्य व निःपक्षपाती असला पाहिजे व तो तसा असेल तर त्याचे प्रसिद्धीने गुन्हा होत नाही. सभेत केलेल्या भाषणाबद्दल वका जबाबदार आहे. प्रकट सभेतील वृत्तान्त योग्य रीतीने प्रासद्ध केल्यास वृत्तपत्रकारावर जबाबदारी येत नाही. परंतु एखादंच भाषण देणे अगर भाषणाचा विपर्यास करणे अगर चुकचे दण