पान:सभाशास्त्र.pdf/207

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

साशास्त्र २०० ००० मत देण्याचा अधिकार प्राप्त होतो. त्याला त्याचे सदसद्विवेकबुद्धीप्रमाणे कसेही मत देतां येते. तथापि कांहीं संकेत या बाबतीत सर्वमान्य झालेले आहेत, जेथे प्रश्नाची चर्चा पुढे चालू राहावी अगर बंद व्हावी असा प्रश्न असेल तेथे चर्चा चालू राहावी या बाजूने त्याने मत द्यावे. आपल्या जादा मताने सभेच्या निर्णयाची जबाबदारी घेऊ नये व त्या दृष्टीने मत दिले आहे हे सांगण्याचा त्याला हक्क आहे. विद्यमान स्थितीत ( Status quo) जादा मताने फरक घडवू नये. विषयाची चर्चा पुरेशी झाली असतां सभातहकुबीची सूचना आली अगर पूर्व प्रश्नाची सूचना आली तर आपले जादा मत त्याविरुद्ध देऊन पुढे चर्चा चालेल अगर प्रश्नावर मत घेतले जाईल, हा परिणाम घडवून आणावा हे इष्ट ठरते, उपसूचनेवर सारखीं- मते पडली असतां जादा मत देऊन विद्यमान स्थिति कायम करावी. जादा मत अध्यक्षाने दिले पाहिजे ही जबाबदारी त्याला टाळता येत नाही. त्याने मत न दिल्यास समेपुढील प्रश्न अमान्य झाला असे समजले जाते. इंग्लंडमध्ये लॉर्डीचे सभेतील अध्यक्षास जादा मत नाही म्हणून तेथे सारखा मते पडल्यास प्रश्न अमान्य झाला असे मानले जाते. सभेचा शेवट निर्णयांत होणे इष्ट आहे म्हणून अध्यक्षास जादा मताचा अधिकार असला पाहिजे व त्याने त्याचा उपयोग केला पाहिजे. जेथे प्रश्नाचे गुणदोषांवर विचार करून त्या दृष्टीने त्याला मत द्यावेसे वाटले तर ते देण्याची त्याला पूर्ण अधिकार आहे. जेथे प्रश्न संचालनात्मक स्वरुपाचा आहे तेथे त्याने आपले जादा मत प्रश्नाची चर्चा चालावी, त्याचा निर्णय व्हावा सभेला पूर्ण विचाराला व वादविवादाला संधि मिळावी या दृष्टीने द्यावे. । सभाकार्यसमाप्तिः-–कार्यक्रमपलिकेतील विषय दिलेल्या क्रमानें अगर सभेच्या संमतीने ठरेल त्याप्रमाणे घेऊन अध्यक्षाने संपविले पाहिजेत. कार्यक्रमपत्रिकेवरील विषय संपले म्हणजे सभाकार्य संपते, कार्यक्रमपत्रिकेत नसलेले विषय कोणत्या स्थितीत घेता येत नाहीत याचे विवेचन पूर्वीच केले आहे. सभेच्या संमतीने उरलेले कार्य अगर विषय दुसरे सभेवर अगर तहकूबसभेवर सोपविता येते. तहकूबसभेवर सोपविले तर त्या सभेत राहिलेल्या कामाचा विचार होईल. नवीन विषय तहकूबसभेत घेता येणार नाहींत. तहकूबसभा म्हणजे मागील सभाच पुढे चालू असे मानले जाते. एक कार्यक्रम पुरा करण्यासाठी बोलावलेली सभा अनेक वेळा भरली तरी ती एकच सभा मानली जाते. जेव्हां उरलेले कार्य अगर विषय दुसरे सभेने पुरे करावेत अगर