पान:सभाशास्त्र.pdf/208

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२० ? सभानियमन व संचालन पुढचे सभेने करावेत अगर रद्द करावेत असा ठराव होतो, तेव्हा पहिली सभा संपली असे मानले जाते. विनमुदत सभा तहकूब झाली तर पुन्हा नियमाप्रमाणे नोटीस देऊन ती भरवावी लागते व तिजपुढे पूर्वीच्याच सभेचा कार्यक्रम असलेमुळे ती नवी सभा होत नाहीं. पुष्कळ वेळां सभेपुढील कार्यक्रमांपैकी एखादाच विषय अगर बाब विनमुदत तहकूब केली जाते. सदर्दू बाब मूळ सभा चालू असेल तर योग्य नोटीस देऊन त्याच सभेत विचारांत घेता येईल. समजा, सालमजकुराच्या पहिल्या तिमाही सभेतील एखादा विषय विनमुदत तहकूब करण्याचा ठराव झाला, पुढे ही तिमाही सभा तीनचार वेळां तहकूब होऊन चालूच आहे अशा वेळी नियमाप्रमाणे नोटीस देऊन सदर्दू ठराव त्या सभेच्या बैठकीत विचारासाठी आणता येईल. कांहीं संस्थांचे नियमांत एखादी बाब बिनमुदत तहकूब झाली याचा अर्थ विशिष्ट काल असा धरण्यांत येऊन त्या कालानंतर जी पहिली साधारणसभा भरेल त्या सभेच्या कार्यक्रमांत त्या विषयाला आपोआप स्थान मिळते. पुणे शहर म्यु. कामिटीचे नियमाप्रमाणे ही मुदत एक महिना आहे. त्यानंतर होणा-या पहिल्या साधारणसभेत तो विषय कार्यक्रमपलिकेवर घेतलाच पाहिजे असा नियम आहे. ज्या संस्थांच्या सभा वारंवार भरतात तेथे सभातहकुबीनें अगर विशिष्ट विषयावरील तहकुबीनें फारशी कालहानि होत नाही. परंतु वर्षातून एकदां अगर दोनदा भरणाच्या सभा व त्याही दैनंदिन न भरता एखादा अर्धा:दिवस भरून समाप्त होतात तेथे सर्व कार्यक्रम संपत नाही व उरलेला पुढील सभेनें अगर दुस-या सभेने विचारांत घ्यावा असाच ठराव होऊन सभा संपविण्यात येते. या परिस्थितीत वर्ष वर्ष अगर महिनेचे महिने निघून जातात, परिस्थिति बदलते. सभाकॉल किती हैं लक्षात घेऊन, विषयांचे महत्त्व लक्षात घेऊन कार्यक्रम कार्यकारीमंडळाने अगर चिटणिसाने अगर अधिकारीमंडळाने ठरविला पाहिजे. तसेच अध्यक्षाने सभाकाल लक्षात घेऊन, विषयांचे महत्त्व लक्षात घेऊन शक्य तर नियोजित कार्यक्रम योग्य संचालन करून पुरा करून सभा संपविली पाहिजे. सर्व कार्यक्रम योग्य चर्चा होऊन, निर्णय होऊन संपल्यानेच सभा कृतार्थ होते व । अध्यक्ष प्रतिष्ठा पावतो, समारोप व सभासमाप्तिः–अवश्य तेथे सभाकार्य संपतांच अध्यक्षाने समारोप करावा. घेतलेल्या निर्णयाचे थोडक्यांत समालोचन करावे. सभासदांना निर्णयाचे दृष्टीने कर्तव्याची जाणीव करून द्यावी. उत्साह, आशा व समा