पान:सभाशास्त्र.pdf/206

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

•.... १९९ सभानियमन व संचालन wwwwwwwwwwwwwwwwww सभेत करता येते. तथापि या दुरुस्त्या निकालानंतर होणा-या असल्यामुळे, निकालाचे अभिप्रायांत त्यायोगें बदल होऊ शकत नाहीं. मतमोजणीदारांचे आंकडे बरोबर आहेत ही खाली करून घेणे, जरूर पडल्यास पुन्हा विभागणी करून मतमोजणी करून घेणे हे अध्यक्षाचे कर्तव्य आहे. एकदां निर्णय जाहीर झाला म्हणजे त्यांत न्यूनता येणे अगर संचालनात्मक दोष आढळणें हैं। अध्यक्षास भूषणावह नाहीं. सभासदांना मत देण्यास पूर्ण स्वातंत्र्य मिळेल अशी परिस्थिति सभेत अध्यक्षाने ठेवली पाहिजे. वादविवादानें, कोटिक्रमाने मते वळविणे हे अगदी युक्त आहे. पत्रके वांटून सभासदांत प्रचार करणेही अयोग्य नाही. पण चर्चेपूर्वी कसे मत देणार हे लेखी विचारणे व उत्तरे घेणे हे समानीतिविरुद्ध आहे. मतमोजणीचे वेळी मतासाठी सभ्यपणे विनविणे गैर नाहीं. पण ओढाताण करणे, सभासदांभोंवतीं घोळका घालणे, दम भरणे, भीति दाखविणे, हे सर्व अयोग्य व असभ्य आहे व अध्यक्षाने ते बंद केले पाहिजे. तसेच सभागृहांत सभेचे जागीं फक्त मताचे वेळीं सभासदच आहेत हे पाहण्याची अध्यक्षाने दक्षता घेतली पाहिजे. प्रेक्षक, नोकर, स्वयंसेवक या सर्वांना मताचे वेळी त्याने सभागृहांतील सभेचे हद्दीबाहेर जाण्यास सांगितले पाहिजे. प्रेक्षकांनी आरोळ्या मारून अगर घोषणा ओरडून सभासदांवर दाब टाकू नये म्हणून अध्यक्षाने जरूर पडल्यास प्रेक्षकांनाही सभागृह सोडून जाण्यास सांगणे अयोग्य नाहीं. तात्पर्य, सभेचे आंत व आसमंतात् शांतता ठेवून सभासदाला इच्छेप्रमाणे मत देता येईल अशी परिस्थिति निर्माण झाली पाहिजे. विधिमंडळांतून प्रत्यक्ष सभास्थानांत मतमोजणीचे वेळी प्रेक्षकांनी अगर सभासदाव्यतिरिक्त कोणी येऊ नये म्हणून सभास्थानांत येण्यासाठी असणारी द्वारेही सूचनेची घंटा बंद झाली की बंद करण्यांत येतात. फक्त सभासद व विधिमंडळाचे नोकरच आंत असतात. द्वारें बंद झाल्यानंतर येणा-या सभासदाला आंत प्रवेश मिळत नाही. निर्णय जाहीर झाला म्हणजे पुन्हा द्वारे उघडण्यांत येतात. जेथे प्रेक्षक व सभासद जवळ जवळ बसतात तेथे अधिक दक्षता घेणे जरूर असते. तेथे ते सभासदांत मिसळण्याचा व त्यांना दमदाटी देण्याचा संभव अधिक असतो. प्रेक्षक गॅलरीत असले तर विशेषं दक्षता घेण्याचे कारण पडत नाहीं. जादा मत-मतमोजणीनंतर सारखी मते पडली तर अध्यक्षाला जादा