पान:सभाशास्त्र.pdf/205

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र १९८ 4......" असेल तर लादू शकतात. मजूरसंघाच्या कार्याचे दृष्टीनें, होणाच्या निर्णयाचे दृष्टीने व प्रत्येक सभेपुढे येणारा प्रश्न घटकसंस्थांतून चर्चिला जातो. या दृष्टीने प्रतिनिधीचे मत त्याला निवडून देणाच्या संस्थेच्या सभासदांच्या संख्येइतकें मोजणे योग्य ठरते. केवळ चर्चेचे दृष्टीने विचार करत एका सभासदाला एक मत व तेही तो हजर असेल तरच असणे योग्य आहे, व असे असेल तरच चर्चा युक्त व यथासांग ठरेल, अधिकारपत्रे तसेच सभासदांच्या संख्या दर्शविणारी कार्डे ही सर्व मतदानाचे वेळी योग्य प्रकारे व नियमाप्रमाणे आहेत की नाहींत ही पाहाण्याची व्यवस्था केली पाहिजे. | विधिमंडळांतून ‘जोडी' ( Pairing ) घेण्याची एक प्रथा असते. दोन्ही पक्षांतील सभासद जे गैरहजर राहू इच्छितात, पण उभय-पक्षांतील मतांचे प्रमाणांत फरक पडू नये असेही इच्छितात ते ‘जोडी' घेऊन गैरहजर राहातात. म्हणजे एका पक्षांतील एक सभासद दुसन्या पक्षांतील एका सभासदाशी ठराविक काल गैरहजर राहाण्याचा करार करतो व या कराराला अनुसरून दोघे गैरहजर राहातात व यामुळे पक्षांतील मतांचे आपसांतील प्रमाण कमी होत नाहीं. अर्थात् ही जोडी' घेण्याची प्रथा सभासदांचे सोयीसाठी आहे व तिला कोठेही नियमाने मान्यता नाही. म्हणून करार मोडून एखादा हजर राहिला व मत दिले तर विरुद्ध पक्षाला कायदेशीर हरकत घेता येत नाही. तथापि, हे करार मोडले जात नाहींत एवढी नीति पाळली जाते. कराराने बांधलेला सभासद हजर राहील, चर्चेतही भाग घेईल, पण मत देणार नाहीं. - सभासदाला मत देण्याचा अधिकार आहे किंवा नाहीं अगर मतनोंदणीचे अगर विभागणीचे पद्धतीसंबंधींचे आक्षेप मतमोजणी सुरू होण्यापूर्वी अगर संपल्यानंतर घेतले पाहिजेत, ती सुरू असतांना घेता येणार नाहींत. मतमोजणी चालू असतां आक्षेप येऊ देणे म्हणजे गोंधळाला आमंत्रण करणे आहे. तसेच मतमोजणी होऊन अध्यक्षाकडे आंकडे आले व नंतर त्याने एकदा निर्णय जाहीर केल्यानंतर आक्षेप घेतां येत नाहीत. निर्णयापूर्वी आलेले सर्व आक्षेप विचारात घेऊन त्यांचा निकाल अध्यक्षाने दिला पाहिजे व नंतर मतमोजणीचा निकाल त्याने जाहीर केला पाहिजे, निकालानंतर बेरजेत चूक आढळून आल्यास विधिमंडळाचे वृत्तांतांत दुरुस्ती करता येते. तसेच एखाद्या सभासदाने दोन्ही बाजूनी मत दिले असेल तर त्याला कोणत्या बाजूला द्यावयाचे होते हे सांगून वृत्तान्तांत दुरुस्ती करावी अशी मागणी कॉमन्स