पान:सभाशास्त्र.pdf/202

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९५ सभानियमन व संचालन पोलचे वेळीं अगर विभागणीचे वेळी, अनेक सभासद तटस्थ राहातात अगर चुकून त्यांचे मत मोजले जात नाहीं; अशा सभासदांना अध्यक्ष निर्णय जाहीर करीपर्यंत आपले मत नोंदवावे हे सांगण्याचा हक्क आहे. निर्णय जाहीर झाल्यानंतर हा हक्क नष्ट होतो. चुकून दुसरीकडे मत दिले व ते मोजले गेले कीं तें बदलण्याचा हक्क सभासदाला नाहीं. अंदाज निकालाचे वेळी एकीकडे भत व पोल अगर विभागणीचे वेळी दुसरीकडे मत असा बदल सभासद करू शकतात. तथापि, विभागणीचे वेळीं अगर पोलचे वेळी मतमोज अगर मतनोंद झाली की मात्र त्याला बदलता येणार नाहीं. ठराव अगर उपसूचना मांडूनसुद्धा त्याविरुद्ध सभासद् मत देऊ शकतो. मात्र त्याने प्राथामिक निर्णयाचे वेळीच हे करावें हैं अधिक चांगले, आधी एक व नंतर त्याविरुद्ध मत देण्याने बेकायदेशीर जरी कांहीं घडलें नाहीं तरी सभासदाला न्यूनता येते हैं। स्पष्ट आहे. उपसूचनेवर तटस्थ राहून तीच ऐनसूचना म्हणून मतास मांडतां तिजवर मत देता येते. विभागणीसाठी एक आवाज काढून प्रत्यक्ष विभागणीचे वेळी त्याविरुद्ध मत देणें हें कॉमन्ससभेचे प्रथेप्रमाणे गैर आहे. केवळ विभागणी मिळावी, म्हणून स्वमताविरुद्ध विरुद्ध आवाज काढणे, केवळ पोल मिळावा म्हणून स्वतःचे बाजूचे बहुमत असूनसुद्धा पोल मागणे हे गैर आहे. कॉमन्ससभेत अशा प्रसंगी अपराधी सभासदाचे मत त्याच्या आवाजांतील मताप्रमाणे नोंदले जाते. एतद्विषयक आक्षेप मात्र निर्णय जाहीर होण्यापूर्वी घेतला गेला पाहिजे. चर्चेचे वेळी गैरहजर व प्रश्न मतास घातला त्याही वेळी गैरहजर पण मतविभागणीचे वेळी हजर राहून सभासदाला मत देता येते. मात्र आपण चकन दसरीकडे मत दिलें, काय प्रश्न मतास होता हे न कळतां मत दिलें म्हणून ते बदलू द्यावे हे मागण्याचा हक्क त्याला नाहीं. वास्तविक चर्चा ऐकून, निदान मतास घालतांना वाचलेला प्रश्न ऐकून सभासदाने मत द्यावें हें इष्ट व युक्त आहे व असा संकेतही कॉमन्ससभेत पूर्वी असे. हल्लीं चर्चेचे वेळीं गैरहजर असणारे सभासद, अगर आंत-बाहेर करणारे अनेक सभासद्, अनेक सभांतून बहुशः दिसून येतात; मात्र विभागणीचे वेळी, मताचे वेळी, सभागृहांत गर्दी लोटते व मतदान केले जाते. पक्षसंघटनेमुळे मतावर चर्चेचा क्वचितच परिणाम होतो. या स्थितीत वरील परिस्थिति अनिष्ट असली तरी अपरिहार्य होते. मत देण्यापुरतें हजर राहाणे इतकीच अनेक सभासदांच्या कर्तव्याची व्याप्ति असते व त्यांच्या सोयीसाठीच फक्त मतापुरतें हजर राहून मत देणे सर्वत्र