पान:सभाशास्त्र.pdf/200

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९३ सभानियमन व संचालन میں نبی می می می میشی سیاسی حمی می میر ای سیاه ا ب

केली जाते. नंतर प्रत्येक भागांतील सभासद मोजले जातात. मोजणीदार आपले आंकडे अध्यक्षाकडे देतात व अध्यक्षाची त्यांच्या आंकड्यांबद्दल खात्री झाली म्हणजे अध्यक्ष त्याबरहुकूम निर्णय जाहीर करतो व तो अखेरचा निर्णय असतो. मोजणीदार हे सभासदांतून अगर संस्थेच्या अधिकारी वर्गातून नेमले जातात. सभासद नेमल्यास प्रत्येक पक्षाचा एक एक याप्रमाणे दोन जोड्या करून एका जोडीला एक भाग असे मोजण्यास सांगितले जाते. मते मोजणारांस मतमोजणीदार (tellers ) म्हणतात. विधिमंडळांतून मतदानाच्या खोल्या (Voting lobbies) असतात. अध्यक्षाने विभागणीची आज्ञा दिली की सभागृहाबाहेर असलेल्या सभासदांना विभागणी सुरू होणार आहे हे कळविण्यासाठी घंटानाद केला जातो. सामान्यतः दोन मिनिटें हा घंटानाद चालू असतो. ही वेळ संपतांच, अध्यक्ष पुन्हा मतास घातलेला प्रश्न वाचून दाखवितो, मतास घालतो व पुन्हा आपला अंदाज सांगतो; तो अमान्य आहे अशी वर दर्शविल्याप्रमाणे ओरड झाल्यास सभासदांना ज्या त्या मतदानाच्या खोलीत जाण्यास सांगतो. बाजूची खोली (Ayes Lobby ), ‘विरुद्ध खोली’ (Noes Lobby ) याप्रमाणे या खोल्यांना संज्ञा असतात, सभासद मतदानाचे खोलीत जातात व तेथे जे मतमोजणीदार असतील त्यांच्या समक्ष नियम असेल त्याप्रमाणे सही करून अगर नांव व नंबर सांगून, यादीत नोंद करवून घेऊन, मतदान करतात. याप्रमाणे मतदान झाल्यानंतर मोजणीदार आपापली यादी मतांची बेरीज करून अध्यक्षाजवळ देतात. अध्यक्ष खात्री करून घेऊन, त्याप्रमाणे मग निकाल जाहीर करतो. जर घंटानाद संपल्यावर अध्यक्ष पुन्हा जेव्हा मताचा अंदाजीं निकाल देतो तेव्हा पुन्हा ओरड करून अमान्यता दर्शविली नाही तर तोच निकाल पुन्हा सांगून कायम कस्तो व मग विभागणी देण्याचे प्रयोजन उरत नाहीं. | एखादा दुसरा विषय सभेपुढे आहे व त्यावर पोल अगर विभागणी मागितली तर हरकत नाही. पण अनेक विषय, शेकडों कलमें असलेली बिले व. त्यांवर अनेक उपसूचना अशा परिस्थितीत प्रत्येक प्रश्नावर विभागणी होऊ लागली, प्रत्येक वेळी पोल मागण्यांत येऊ लागला तर कठीण प्रसंग येईल. जेथे अंदाजीं अगर प्राथामिक निकालाचे वेळी एका बाजूला प्रचंड बहुमत व एका बाजूला मुठभर लोक याप्रमाणे असेल व हे मूठभर केवळ त्रास स...१३