पान:सभाशास्त्र.pdf/199

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ससाशास्त्र १९३२ त्याप्रमाणे निर्णय अध्यक्ष जाहीर करतो. या रीतीने मतनोंदणी केल्यास निर्णय अमान्य आहे, मते मोजतांना चूक झाली हे म्हणण्यास वाव राहत नाहीं. तेथे पोल अगर मतमोजणीचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रत्येक सभासदाचे मत काळजीपूर्वक मोजले जाते. या पद्धतीत आग्रहाने, भिडेनें अगर भीतीनें मतदान न होतां सभासदाला त्याच्या खुषीप्रमाणे मत देता येते. व कसे दिले हे कळून येत नाही. प्रगटपणे हात वर करून मत दिल्याने कोणी कसे मत दिले हे कळते. सार्वजनिक प्रश्नावर वास्तविक प्रगटपणे मत देणेच योग्य आहे. सभासदांची कर्तव्यबुद्धि व नीतिधैर्य लोकांपुढे स्पष्टपणे येणे जरूर आहे. ज्या संस्थेचे सभासदत्व निवडणुकीने मिळत असते, ज्या प्रातिनिधिक संस्था आहेत, तेथे होणारे निर्णय सार्वजनिक महत्त्वाचे असतात व ते घडवून आणण्याचे काम कोण सभासद, कोण प्रतिनिधि कसा वागला, हे कळणे जरूर आहे. म्हणून तेथील मतदान उघडपणे होणे इष्ट आहे. व याच दृष्टीने विधिमंडळांतील मतनोंदणीच्या याद्या ( Voting lists ) प्रसिद्ध करण्यांत येतात. अध्यक्षाची निवडणूक अगर अधिका-याची नेमणूक वगैरे प्रसंगी गुतमतदानपद्धति सामान्यतः स्वीकारली जाते. कांहीही असले तरी सार्वजनिक प्रश्नावर होणारें मतदान उघडपणे झाले पाहिजे. प्रत्येक सभासदाने सदर्दू प्रश्नावर कसं मत दिलें हें अन्य सभासदांना व जनतेलाही कळले पाहिजे. | जेथे प्रगट मतदान केले जाते व जेथे मागणी आल्यावरून अध्यक्ष पोलची अगर दिमागणीची आज्ञा देतो, तेथे ती होऊन मग सभेचा निर्णय कायम होतो. जेथे सभासदांची संख्या मर्यादित आहे, तेथे अध्यक्ष प्रत्येक सभासदाला त्याचे मत विचारतो व या रीतीने नोंद करून होणारा निकाल जाहीर करतो. स्थानिक स्वराज्यसंस्थांतून हीच पद्धत स्वीकारली जाते. अध्यक्ष विचारीत जातो व अधिकृत इसम सभासदाचे नांवापुढे त्याचे मत कागदावर टिपत जातो. या रीतीने बाजूचे, विरुद्ध व तटस्थ कोण आहेत हे तपशीलवार कळते, जेथे संख्या पुष्कळ आहे, शेंकडोंनीं आहे, तेथे प्रत्येक सभांसदाला विचारून मतनोंद करणे अशक्य आहे. या परिस्थितींत सभागृहाचे दोन भाग करून एका भागांत प्रश्नाचे बाजूचे सभासद व दुसरे भागांत प्रश्नाचे विरुद्ध सभासद, याप्रमाणे बसण्यास सांगितले जाते, अशी सभेची विभागणी हति. तटस्थ थोडे असतील तर आपल्या जागी बसून मोजणीचे वेळीं तटस्थ म्हणून सांगतात; मोठी संख्या असेल तर त्यांचेसाठी आणखी निराळी जागा