पान:सभाशास्त्र.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ सार्वजनिक सभातंत्र भाषण केले तर त्याची जबाबदारी अर्थात् सभाचालकांवर नसते. सभेसाठी घेतलेल्या जागेस कांहीही तोशीस लागली तर त्याची भरपाई मालकाला सभाचालकांनी करून दिली पाहिजे. सार्वजनिक सभा, सार्वजानिक जागी म्हणजे रस्ते, मोकळ्या जागा, या ठिकाण जेव्हां भरतात अगर भरविण्यांत येतात तेव्हा काही गोष्टी लक्षांत ठेवणे जरूर आहे. खाजगी रस्त्यावर सभा भरविणे झाल्यास अर्थात् जे मालक असतील त्यांची परवानगी लागेल. सार्वजनिक रस्त्यावर, तो केवळ सार्वजनिक आहे म्हणून सार्वजनिक सभा भरविण्याचा निरपेक्ष हक्क नाहीं; त्याचबरोबर सभा केवळ रस्त्यावर भरविली म्हणून गुन्हाही होत नाही. केवळ सार्वजनिक रस्त्यावर सभा भरली आहे म्हणून पोलिसांना ती बंद करता येत नाहीं. सार्वजनिक रस्ता हा • वाहतुकीसाठी आहे; हा त्याचा मुख्य उद्देश आहे. मुख्य प्रश्न जाणारा येणाराला वाट आहे का ? योग्य वाट असेल व अडथळा होत नसेल तर, रस्त्यावर भरलेली सभा बंद करण्याचा अधिकार केवळ ती रस्त्यावर भरली आहे म्हणून नाहीं. रस्ता ही सार्वजनिक मालकीची मिळकत असली तरी सर्रास सभा करण्याकडे तिचा उपयोग करण्याचा अनियंत्रित व निरपवाद अधिकार जनतेला नाहीं. रस्ता हा रस्ता आहे व हे त्याचे स्वरूप व कार्य सभा चालू असतांना टिकले पाहिजे; म्हणजेच रहदारीला योग्य वाव राहिला पाहिजे. जनतेला गैरसोय, अडथळा धोका न व्हावा म्हणून सार्वजनिक रस्ते व जागा यांच्या उपयोगाबाबत सर्वत्र पोलिस-नियम असतात. कोणत्या बाजूने जावें, गाड्या कोठे उभ्या कराव्यात, गुरें केव्हां वः कशी न्यावत, किती वेगाने गाड्या हाकाव्यात, सार्वजनिक मोकळ्या जागेत प्रवेश कुठल्या मार्गाने करावा, रस्त्यावर किती जागा सोडून सभा करावी वगैरे बाबतींत नियम करण्याचा अधिकार पोलिसाला असतो. * डिस्ट्रिक्ट पोलिस अॅक्टाचे कलम २२ प्रमाणे हा अधिकार प्रत्येक जिल्ह्यांतील प्रमुख पोलिस-अधिका-याला दिलेला आहे. त्याचप्रमाणे १६ बॉब पोलिस अॅक्टाचे कलम २२ प्रमाणे हा अधिकार मुंबईचे पोलिस-कामिशनर याला दिला आहे. कायम नियमांबरोबर योग्य कारणांसाठी, तात्पुरती रस्त्यावरील वाहतूक बंद करण्याचा अगर तिच्यांत बदल करण्याचा अधिकारही सर्वत्र दिलेला आहे. * बॉब डिस्ट्रिक्ट पोलिस अॅक्टाचे कलम ३९ प्रमाणे, योग्य कारणांकरितां जिल्हा-मॅजिस्ट्रेटला रस्ता अगर सार्वजनिक जागा