पान:सभाशास्त्र.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सक्षाशास्त्र १२ संपवावी याला मर्यादा नाही. समाविषयाची चर्चा केव्हा संपवावी हे सभेनेच ठरवावयाचे असते. तथापि ओंजळींतील पाणी झिरपून जाण्यापूर्वी संकल्प संपावला पाहिजे, तसे हळूहळू श्रोतृवृंद उठून जाऊन केवळ व्यवस्थापक राहण्यापूर्वी सभा संपविणे हे मुत्सद्दीपणाचे असते. एक उठला म्हणजे दुसरा उठतो, सभेतील एकाग्रता नष्ट होते, वक्ता खंडित होतो, सभेतील प्रसन्नता जाते, सभा बेरंग होते. अध्यक्षांनी निश्चित काळ संपताच सभा संपेल असे सांगितल्याने व वक्त्यांचा योग्य क्रम ठेवल्याने श्रोतृवृंद बराच स्थिर राहण्याचा संभव असतो. सभास्थानः—सार्वजनिक सभा सार्वजनिक ठिकाणींच भरली पाहिजे असें नाहीं. खाजगी मालकीचे जागेत मालकाचे परवानगीने भरावतां येते. मात्र हजर राहण्यास सर्वांना मोकळीक असली पाहिजे. मालकाची परवानगी आगाऊ घेणे जरूर आहे; नाहीं तर जागेत येणारे अन्यायाची आगळीक करणारे ( Tress passers ) गुन्हेगार ठरतात. त्याचप्रमाणे ज्या शतविर जागा घेतली असेल त्या व्यवस्थापकांनी म्हणजे सभाचालकांनी पाळल्या पाहिजेत व हजर श्रोतृवंद पाळील अशी खबरदारी घेतली पाहिजे. संस्थेची क्रीडांगणे, दिवाणखाने, पटांगणे वगैरे त्या त्या संस्थेच्या व्यवस्थापकांकडून नेहमीं सार्वजनिक सभेसाठी घेण्यात येतात. ही सर्व स्थाने खाजगी मालकीचच समजली पाहिजेत. संस्थेच्या सभासदांव्यतिरिक्त तेथे जाण्याला अगर राहण्याला कोणाला हक्क नाहीं. असल्या सर्व जाग आगाऊ परवानगी घेऊन जरी सभा भरविली तरी सभेमुळे जागेचे कांहीं नुकसान झाल्यास सभेचे चालक त्यास जबाबदार असतात. मोडतोड कोणीही करो जबाबदारी सभाचालकांची असते. जागा मागणारांकडून लेखी अर्जे घेऊन जागा देणे इष्ट असते. उभयपक्षांना काय ठरविले आहे याचे निश्चित ज्ञान असते. करारांतील शर्ती मोडल्याचे सभा चालू असतांना लक्षात आले तर मालकाला सभा बंद करून जागा ताबडतोब खाली करून मागण्याचा हक्क नाहीं. कराराच्या शर्ती मोडल्याबद्दल नुकसानभरपाई मागण्याचा हक्क त्यांना आहे. सभा बंद करण्याचा अगर शर्त मोडली या सबबीवर दांडगाईने सभा मोडण्याचा हक्क त्यांना नाहीं. सभेत दंगल झाली, शांतताभंग झाला तर समाचालकांवर ती जबाबदारी आहे. सभेत जें कांहीं होईल त्याची जबाबदारी सामान्यपणे सभाचालकांवर आहे. कोणी वक्त्याने बदनामीकारक अगर राजद्रोहात्मक