पान:सभाशास्त्र.pdf/198

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९१ सभानियमन व संचालन مرخرخر تورنتی شویی تعمیر کی ایي جي جي جي بي مر بي جي جي کير جي جي جي جون جون جمیر جو مر कोणी न ओरडल्यास पुन्हा “होयचे बाजूने निकाल' असे म्हणून तो अखेरचा निकाल म्हणून जाहीर करतो, ओरडल्यास पुन्हा होयचे बाजूने निकाल असे म्हणतो. पुन्हा नाहींचे वाजूने निकाल', अशी अमान्य असणारांनी ओरड केल्यास मग ‘विभागणी’ ( Division ) देतो. त्याच क्रमाने पहिल्याने “नाहींचे वाजूने निकाल' असे त्याने जाहीर केल्यास अमान्य असणारांनी “होयच्या बाजूने निकाल' असे ओरडले पाहिजे, न ओरडतील तर पुन्हा अध्यक्ष ‘नाहींचे बाजूने निकाल' म्हणून म्हणेल व निकाल कायम करील. ओरडले तर पुन्हा नाहींचे बाजने निकाल' असे म्हणेल, व पुन्हा अमान्य असणारांनी 'होयचे बाजने निकाल' अशी ओरड केली तर मग अध्यक्ष विभागणी देतो. - हाताचे अंदाजावरून अगर आवाजाचे अंदाजावरून दिलेला निर्णय मान्य नसल्यास अध्यक्षानें मतमोजणीची आज्ञा द्यावी. हाताचा अंदाज करून दिलेला निर्णय मान्य नसणारांनी पोल पोल' म्हणूण मागणी केली पाहिजे, ही मागणी निर्णय जाहीर होतांच केली पाहिजे. ही मागणी कांहीं ठिकाणी एका सभासदालासुद्धा करता येते. काही ठिकाणी, कांहीं विविक्षित संख्या मागणारांची असावी लागते. नियमाभावीं तीन सभासदांनीं तरी मागणी केली असेल तर पोल' अगर ‘विभागणी द्यावी. पोल' अगर ‘विभागणी याचा अर्थ अध्यक्षाचा निकाल अमान्य असून त्याविरुद्ध आमसभेकडे मागितलेली दाद हा आहे. ‘पोल' अगर ‘विभागणी' म्हणजे प्रत्येक सभासदाचे मत काळजीपूर्वक घेणे व नंतर निकाल जाहीर करणे होय. अध्यक्षाने साधा रणपणे आवाजावर अगर साधारणपणे हात मोजून दिलेला निकाल प्रसंगी चुकीचा असण्याचा संभव असतो. पोलनें अगर विभागणीने चुकीचा संभव राहत नाहीं. | कांही संस्थांचे नियमांत विशिष्ट प्रसंगी अध्यक्षास गुप्तमतदानपद्धतीने ( Ballot ) सभासदांचे मत घेता येते. याशिवाय सभेला गुप्तमतदान व्हावें असा ठरावही करता येतो, व तसा पास झाल्यास मतनोंदणी त्याप्रमाणे झाली पाहिजे. गुतमतदानपद्धतींत प्रत्येक सभासदाला मतपलिका देण्यांत येते. त्या मतपलिकेवर प्रश्नाचे बाजूने मत असल्यास ‘बाजूचे कॉलममध्ये, विरुद्ध असल्यास ‘विरुद्धचे कॉलममध्ये ४ करून मतपत्रिका सीलबंद पेटीत टाकावी लागते. नंतर अध्यक्ष अगर अन्य अधिकृत इसम त्या मोजतो व नंतर