पान:सभाशास्त्र.pdf/197

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र १९० ••••••• द्यावी. या तीन मतांचे गटांनी स्वतंत्र मते द्यावत की, दोन गटांना तिस-या विरुद्ध एकवटण्याचा अधिकार मिळावा हा प्रश्न उपस्थित झाला. स्वतंत्रपणे मते द्यावत असे ठरले. आणि तसे होतांना जेव्हा असे आढळून आलें कीं, या करण्याने शिक्षा होऊ नये हा गट यशस्वी होईल व खुनी इसम सटेल, तेव्हां हद्दपारीवाल्या गटांत मृत्यूची शिक्षा द्यावी म्हणणारा गट जाऊन बसला व स्वतःचे अस्तित्व त्याने सोडून देऊन खुनी इसम जो अजीबात निसटला असतां ही आपत्ति टाळली. हट्टाला पेटून तिस-या गटाने स्वतंत्र राहून आपला गट ठेवून मत दिले असते तर खुनी इसम सुटला असता. त्याजबरोबर सभेपुढे प्रश्न मांडण्याची रीत पण अयोग्य होती. एका वेळी एकापेक्षा अधिक प्रश्न मतासाठीं सभेपुढे असता कामा नयेत. एका वेळी मतासाठीं एक प्रश्न, व त्यावर सभेचे मत याप्रमाणे झाले पाहिजे. प्रत्येक प्रश्न मान्य अगर अमान्य होऊन निकाल लागला पाहिजे. म्हणजेच बहुमत स्पष्ट होते. बहुमत मिळण्यासाठी, स्पष्ट होण्यासाठी अनेक विरोधी गट एकत्र येणे अपरिहार्य आहे. उपसूचना हा एकच मार्ग अनेक गटांत तडजोड करून त्यांना एकत्र आणणारा आहे, व उपसूचनेचा उद्देशही विरोधी व तटस्थ यांना मूळ प्रश्नांत बदल सुचवून त्याकडे वळवून आणण्याचा असतो. सभेचा निर्णय हा बहुमताचा निर्णय असला पाहिजे व तो एका वेळी एकच प्रश्न मतास टाकल्याने सिद्ध होतो. | मतास घालणेः-सभेपुढे जो प्रश्न मतास घालावयाचा असेल तो अध्यक्षाने वाचावा व नंतर जे प्रश्नाचे बाज़” असतील त्यांना हात वर करण्यास सांगावे. त्या हातांचा अंदाज करावा. नंतर जे त्याविरुद्ध असतील त्यांना हात वर करण्यास सांगावे, त्या हातांचा अंदाज घ्यावा. बाजूचे हात जास्त असतील तर सभेचे मत प्रश्नाचे बाजूचे, असा निर्णय द्यावा. विरुद्ध असणारे हात जास्त असतील तर सभेचे मत प्रश्नाचे विरुद्ध आहे सबब तो अमान्य असे जाहीर करावे. विधिमंडळांतून अध्यक्ष प्रश्नाचे बाजूने असतील त्यांना 'होय' (Ayes ) म्हणण्यास सांगतो व विरुद्ध असतील त्यांना ‘नाहीं {Noes ) म्हणण्यास सांगतो. व आवाज अंदाज़न होयचे बाजूने निकाल (Ayes have it ) अगर नाहींचे बाज़नें निकाल (Noes have it ) चाप्रमाणे जाहीर करतो. ज्या वेळी ‘होयचे बाजूने निकाल' असे म्हणतो त्या वेळा ती मान्य नसणारांनीं नाहींचे बाजूने निकाल असे ओरडले पाहिजे,