पान:सभाशास्त्र.pdf/196

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८९ सभानियमन व संचालन عمر س عی شدن عمر مرے من میں خون تخم کاری میں معاون توی همین میں ایک دن میری و सभेला अध्यक्षाने स्पष्ट केले पाहिजे. सभासदांनी जागृत राहिले पाहिजे हे खरे; तथापि योग्य मार्गदर्शन अध्यक्षाने केले पाहिजे. सभाकायद्याची माहिती व सभासंचालनाची माहिती प्रत्येक सभासदाला असली पाहिजे. कोणत्या उपसुचनांना पाठिंबा दिला पाहिजे, कोणाला विरोध केला पाहिजे हे त्याने आपले मूळ प्रश्नावरील मताचे दृष्टीने ठरविले पाहिजे. सभाकायची व सभातंत्राची माहिती ही वादविवादांत यश मिळविण्याचे एक मोठे साधन आहे. सभातंत्राचे यथार्थ ज्ञान बहुसंख्याकांना नसल्यास अल्पमतवाले सभा मारून जातात; त्यांचे मताप्रमाणे निर्णय होतो. अनेक वेळां योग्य डावपेचाने वागून अल्पमतवाले अधिक अनर्थ टाळू शकतात, बहुमताच्या सामर्थ्याला मर्यादा घालू शकतात. सभेच्या नियमामुळे अल्पसंख्याकांना बहुसंख्याकांशी बरोबरीने दोन हात करता येतात, कालहरण करतां येते, अडथळे व अडचणी उत्पन्न करतां येतात, व या सामथ्र्याचे जोरावर तडजोडीच्या निर्णयालाही भाग पाडतां येते. लोकशाही म्हणजे विचारविनिमय, कांहीं तरी देवाण-घेवाण होऊन, समन्वय होऊन, निर्णय झाला पाहिजे. केवळ वहुमताने होऊ लागले तर ती हुकूमशाहीच होईल. एकाऐवजी अनेकांची संघटित, पक्षनिष्ठ, हुकूमशाही ती होईल, व त्यामुळे अधिक भयंकर होईल, अल्पमतवाले यांनीही सभा म्हणजे विचारविनिमय याच दृष्टीने वागले पाहिजे व हट्टाला पेटून तुपाशीं अगर उपाशी अशी दृष्टि ठेवू नये. सभेत निर्णय मिळवून काम करावयाचे तेथे तडजोडीला प्राधान्य येतेच, किंबहुना त्यावरच सभेचे यश अवलंबून असते. | वरील दृष्टि ठेवून सभासदांनी मतदान केले पाहिजे. तसे न केल्यास अन्याय व अनर्थ करणारे परिणाम घडून येतात. प्रसंग पाहून विरोध विसरून अन्य वाटा मतदानाचे काम सहकार्य करावे लागते. खरे मतप्रदर्शनार्थ सहकार्य न केल्यास, तसेच योग्य क्रमाने प्रश्न सभेपुढे मतास न मांडल्यास काय अनपेक्षित परिस्थिति निर्माण होते याचे सुंदर उदाहरण रोमन सेनेटमधे घडलेले पुढे दिले आहे. रोमन अधिकारी डेक्टर आत्महत्या करून मेला का त्याला याच्या नोकरानें जो गुलाम नव्हता त्याने मारले ? नोकराने मारलें तें डेक्ट२च्या सांगण्यावरून का खून करण्याचे हेतूने ? असे प्रश्न सेनेटपुढे आले. एकानें ठराव मांडला की, जे स्वतंत्र झाले आहेत (म्हणजे गुलामीतून ज्यांना मुक्त केले आहे ) त्यांना काहीही शिक्षा होऊ नये. दुस-याने ठराव मांडला की, त्यांना हद्दपार करावे. तिस-याने ठराव मांडला की, त्यांना मृत्युची शिक्षा