पान:सभाशास्त्र.pdf/195

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

साशास्त्र १८८ धरावा. चर्चातहकुवीला अगर सभातहकुबीला जेथे अनेक उपसुचना मांडल्या असून निरनिराळा काल त्यांत असेल तर सर्वांत अधिक काल दर्शविणारी प्रथम मतास टाकावी. ती पास झाल्यास बाकी सर्व वाद होतात, ती नापास झाल्यास त्यापेक्षा कमी काल दर्शविणारी मतास टाकावी व ती नापास झाल्यास त्याहून कमी काल दर्शविणारी मतास टाकावी. याप्रमाणे क्रम धरावा. | पास झालेली उपसूचना मूळ प्रश्नांत बदल करीत असते म्हणून उपसूचनेने दुरुस्त झालेला ठराव मतास घातला पाहिजे. तो घालण्यापूर्वी झालेली दुरुस्ती अगर बदल त्यांत समाविष्ट करून तसा तो वाचून दाखवून मतास टाकल्यास सभेला मत देण्याला सुलभ पडते, कशाबर मत द्यावयाचे आहे याचा बोध होतो, केवळ उपसूचना पास झाली म्हणजे सभेचा निर्णय झाला असे होत नाहीं. उपसूचनेने सर्व ठराव बदलला असला तरी ती पास झाल्यानंतर पुन्हा ती उपसूचना ऐनसूचना (Substantive proposition ) म्हणून मतास घातली पाहिजे. तिच्यावर मग जें मत पडेल तो सभेचा विधियुक्त निर्णय होय. समजा, चर्चतहकुबीच्या ठरावाला. अनेक कालदर्शक उपसूचना आल्या व एक पास झाली, तरीही ती पुन्हां ऐनसूचना म्हणून मतास मांडली पाहिजे. ती नापास झाल्यास चर्चातहकुबी सभेला पसंत नाही, हा अखेरचा निर्णय होतो. पास झालेली उपसूचना दुरुस्त ठरावांत समाविष्ट करून अगर ऐन सूचना म्हणून पुन्हा मताला मांडून सभेला आपले मत पूर्ण विचारांती ठरविण्याची संधि मिळते. पुष्कळ वेळां डावपेंचाचे दृष्टीने उपसूचना पास केली जाते, व ती दुरुस्त ठरावांत समाविष्ट होऊन आली म्हणजे तो नापास केला जातो, अगर ऐनसूचना म्हणून आली म्हणजे ती नापास केली जाते. या परिस्थितीत सर्व चर्चा विफल होते. तथापि तो सभेचा विचारांती घेतलेला निर्णय हे मानलेच पाहिजे, प्रश्न मतास घालतांना सभेचे यथार्थ मत स्पष्ट होईल या दृष्टीने अध्यक्षाने दक्षता घेतली पाहिजे, व त्या दृष्टीने मत घेण्याचा क्रम ठरविला पाहिजे. केवळ अनेक वेळां मत घेणे टळावे म्हणून निवड करून सभासदांचे मनांत गोंधळ उत्पन्न होईल असा क्रम ठेवु नये. प्रश्नांतील विधानांचा अगर भागांचा क्रम लक्षात घेऊन त्यावरील उपसूचना मतास टाकाव्यात. प्रसंगी आलेल्या कालानुक्रम मतास टाकाव्यात, प्रसंगी एक विरुद्ध दुसरी याप्रमाणे करावं, पण कशावर मत देत आहोत हे व त्याचा मूळ प्रश्नावर होणारा परिणाम है