पान:सभाशास्त्र.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

?? सार्वजनिक सभातंत्र नाहींत. कायद्याचे दृष्टीने हस्तपत्रिकेवर एकाचे तरी नांव असावे लागते. (२) मोठमोठाल्या पत्रिका (posters) अगर पाट्या गर्दीचे ठिकाणी लावून सभेची खबर देतां येते, विषय, जागा, वेळ ही सर्व त्यांत असावी लागतात. (३) रस्त्यावर भुइपत्रिका काढून सभेची जाहीर खबर देण्याचाही एक प्रकार आहे. (४) दौंडी देऊन, छाव्या मिरवणुकी अगर फेन्या काढूनही जाहीर खबर देण्याचा प्रकार नामवंत झाला आहे. (५) स्थानिक वर्तमानपत्रांत ठळक जागीं अगर स्थानिक कार्यक्रमाचे मथळ्याखालीं मजकूर देऊन खबर जाहीर करता येते. पक्षविरहित प्रसिद्धि देण्याचा प्रघात सार्वजनिक सोयीचे दृष्टीने चांगला आहे. सभेच्या निमंत्रणाची प्रसिद्धि वर्तमानपत्रांत येण्याने बरेच काम होते व सभेचा वृत्तांत जर योग्य रीतीने वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाला तर कार्याचे दृष्टीने ते इष्टही ठरते. सर्व पक्षांच्या वर्तमानपत्रांत मजकूर देऊन प्रसिद्ध वक्त्यांची नांवें दिल्याने श्रोतृवृंदही अधिक येतो. सभेचे वेळेचे आधी अमुक काळ तरी प्रसिद्ध झाली पाहिजे अगर नोटीस जनतेला मिळाली पाहिजे असा निबध सार्वजनिक सभेबाबत नाहीं. तथापि सभेचे आधीं योग्य वेळ प्रासाद्ध केल्याने सभेला श्रोतृवृंद व महत्त्व अधिक येते हे निश्चित आहे. | सभाकाळः--दिवसाचे अमुक वेळी सभा बोलाविली पाहिजे असा निबंध सार्वजनिक सभेबाबत नाहीं, तथापि जनतेची सोय या दृष्टीने कांहीं कांहीं गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. कांहीं परंपरा स्थानपरत्वें उत्पन्न होतात. मोठ्या शहरांतील सभा सायंकाळीं ठेवणे इष्ट ठरते. उपनगरांतून श्रोते येत असतात. सभा संपून योग्य वेळी घरी जाता यावे या दृष्टीनेही सायंकाळची वेळ इष्ट असते. लहान शहरें अगर खेडेगांवांतून रात्री सभा ठेवल्याने लोकांना सोइस्कर पडते व लोक संख्येने जमतात. बाजाराचे गांव सभाकाल साधारण बाजार फुटण्यापूर्वी ठेवल्याने बरेच कार्य होते. काही ठिकाणी सभा रात्री ११ चे पुढे सुरू होतात व दीर्घकालही चालतात. सामान्यतः सभा रात्री ११ चे आंत संपावी. सभेला लोक यावेत व जास्तीत जास्त संख्येने अखेरपर्यंत राहावेत या दृष्टीने सभेची वेळ असावी, सभा किती वेळ चालावी याला कालदृष्टीने मर्यादा नाहीं. भाड्याने जागा ठराविक वेळेपर्यंत घेतली असल्यास त्या वेळांत सभा संपलीच पाहिजे, हल्ली बोलपटगृहे याप्रमाणे घेण्यांत येतात व ठराविक मुदतीत सभा संपवावी लागते. पुष्कळ वेळां पोलिसनिबंध असतात. तथापि सभा, नियमांचे अगर संकेताचे दृष्टीने केव्हां