पान:सभाशास्त्र.pdf/186

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७९ सभानियमन व संचालन

उपसूचनेलाही उपसूचना देतां येते. उपसूचनेला उपसूचना देणे झाल्यास नोटिशीची आवश्यकता नाही. तथापि, कांहीं विधिमंडळांच्या नियमांतून ती मांडण्यास अध्यक्षाची परवानगी लागते; हक्क म्हणून मांडता येत नाहीं. उपसूचनेला उपसूचना आली म्हणजे सभेपुढे तीन प्रश्न उपस्थित होतात. मूळ प्रश्न, त्यावरील उपसूचना व उपसूचनेवरील उपसूचना. या परिस्थितींत मूळ प्रश्न थोडा वेळ बाजूला सारला जातो. उपसूचना ही तात्पुरती ऐनप्रश्न ( Substantial proposition ) होते व त्या दृष्टीने चर्चा होऊन मते घेण्यांत येतात. म्हणजे प्रथम उपसूचनेचे उपसूचनेवर मत; ती पास झाल्यास दुरुस्त उपसूचनेवर मत; ती पास झाल्यास दुरुस्त मूळ प्रश्नावर मत; याप्रमाणे क्रम असतो; व याप्रमाणे क्रम ठेवला म्हणजे गोंधळ उडत नाहीं. मत देतांना कशावर मत देणे आहे हे कळले पाहिजे. तसेच सभेचे मताचा विपर्यास होता कामा नये असा क्रम असला पाहिजे. नाही तर एखादे वेळी सभेचे वस्तुतः बहुमत जे असेल त्याविरुद्ध निर्णय होतो. सभेपुढील प्रश्न व त्यावरील उपसूचना, व उपसूचनांवरील उपसूचना यांनी प्रश्नांत गोंधळ उत्पन्न होऊ नये म्हणून, योग्य रीतीनें तो पृथक् करून मतास घातला पाहिजे. जेव्हां उपसूचना फक्त काही शब्द घालावेत अगर जोडावेत अगर गाळावेत अशी आहे, व या उपसूचनेलाच उपसूचना असून मुख्य प्रश्नाशीं तिचा संबंध नसेल तर, मताला टाकण्यांत अडचण नसते. उपसूचनेवरील उपसूचना प्रथम मतास टाकावी व नंतर तिचा निकाल लक्षात घेऊन मुख्य उपसूचना मतास टाकावी; व तिचा निकाल लक्षांत घेऊन मुख्य प्रश्न मतास टाकावा. मुख्य प्रश्न संस्थेला एक अधिक कार्यवाह असावा व तो वेतनी असावा. व त्याला रु. ६० पगार असावा व रु. १० घरभाडे असावे. उपसूचना 4 ‘कार्यवाह असावा' या शब्दापुढील सर्व शब्द गाळावेत. या उपसूचनेला उपसूचना * व त्या जागी ‘व त्याला फक्त योग्य प्रवासभत्ता द्यावा, हे शब्द घालावेत' ही आहे. या परिस्थितीत ही उपसूचनेवरील उपसूचना मतास प्रथम घालावी; ती पास झाल्यास पहिली उपसूचना पुढील प्रमाणे दुरुस्त होते. * ‘कार्यवाह असावा' या शब्दापुढील सर्व शब्द गाळावेत व त्या जागीं व त्याला फक्त योग्य प्रवासभत्ता असावा' हे शब्द घालावेत.” ही दुरुस्त उपसूचना मतास घालावी; ती पास झाल्यास दुरुस्त ठराव पुढीलप्रमाणे होईल. * संस्थेला एक अधिक कार्यवाह असावा व त्याला फक्त योग्य