पान:सभाशास्त्र.pdf/187

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र १८० प्रवासभत्ता असावा.” मग शेवटी हा दुरुस्त ठराव अगर मुख्य प्रश्न मतास घालावा. परंतु जेव्हां पहिली उपसूचना मुख्य प्रश्नांतील कांहीं शब्द गाळावेत अशी असून या उपसूचनेवरील उपसूचना मूळ उपसूचनेतील कांहीं शब्द गाळावेत अशी असेल तर गोंधळ उत्पन्न होतो. या उपसूचनेवरील उपसूचनेचा अर्थ मूळ प्रश्नांत मूळ उपसूचनेत कमी करावे म्हणून सुचविलेल्या शब्दांपैकी कांहीं पुन्हा तेथे ठेवावे हा असतो. समजा, वरील ठरावाला पहिली उपसूचना ८६ ‘कार्यवाह असावा' या शब्दापुढील ‘व तो वेतना असावा व त्याला रु. ६० पगार असावा व रु. १० घरभाडे असावे हे सर्व शब्द गाळावेत, अशी उपसूचना आहे. या उपसूचनेला उपसूचना पुढीलप्रमाणे आहे. * उपसूचनेंतील ‘व त्याला रु. ६० पगार असावा' हे शब्द गाळावेत. या उपसूचनेवरील उपसूचनेचा उद्देश व त्याला रु. ६० पगार असावा' हे शब्द मूळ प्रश्नांत राहावे व जे हे शब्द उपसूचना काढून घेऊ इच्छिते, ते ठेवावेत हा आहे. गोंधळ होऊ नये म्हणून प्रथम उपसूचनेवरील उपसूचनेतील जे शब्द गाळावेत म्हणून सुचविले आहेत ते राहावेत, हा प्रश्न मतास टाकावा. ते राहावेत असे मत पडल्यास दुसरा प्रश्न उपसूचनेतील जे सर्व शब्द गाळावेत म्हणून सुचविले आहेत ते राहावेत, हा मतास टाकावा. ते राहावेत असे मत पडल्यास मूळ प्रश्न जसाचे तसा शिल्लक राहतो व तो मतास घालावा. ते राहूं नयेत असे मत पडल्यास ते सर्व शब्द गाळून दुरुस्त झालेला ठराव मतास घालावा, समजा, ‘उपसूचनेवरील उपसूचनेतील जे शब्द गाळावेत म्हणून सुचविले आहेत ते राहावेत' या प्रश्नावर सभेचे मत ते राहूं नये असे पडले म्हणजे मूळ उपसूचनेतून तेवढे शब्द गाळून दुरुस्त उपसूचना मतास येते. तिचे स्वरूप मग पुढीलप्रमाणे होईल. १८ ‘व तो वेतन असावा व त्याला रु, १० घरभाडे असावे' हे शब्द गाळावे. या दुरुस्त उपसूचनेत गाळावेत म्हणून सुचविलेले शब्द राहावेत' हा प्रश्न मग मतास घालावा. राहावेत असा निर्णय झाल्यास मूळ प्रश्न जसाचे तसा शिल्लक राहतो व तो मतास घालावा. राहू नये असा निर्णय झाल्यास दुरुस्त उपसूचनेतील शब्द गाळून मुख्य प्रश्न मतास घालावा. त्याचे स्वरूप मग पुढीलप्रमाणे राहते. * संस्थेला एक अधिक कार्यवाह असावा व त्याला रु.६० पगार असावा” हा प्रश्न मग अखेरचा म्हणून मतास घालावा, जन्हा मूळ उपसूचना प्रश्नांतील कांहीं शब्द गाळून त्याऐवजी दुसरे शब्द