पान:सभाशास्त्र.pdf/185

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र १७८

ތރއގދތރއވރވގތކރއގތރ गाळावेत ही उपसूचना पास झाली तर प्रश्नच नाहीं. सभेचे मत काय आहे। हैं स्पष्ट झाले. पण शब्द गाळावेत ही उपसूचना नापास झाली तर पगाराचे प्रमाणाबद्दल व घरभाड्याचे प्रमाणाबद्दल उपसूचना देता येतील व सभेचे मत स्पष्ट होईल. वेतनी असावा असे वाटून कमी अगर जास्ती पगार असावा हे मत जर पहिली उपसूचना जशीच्या तशी पास झाली तर स्पष्ट होऊ शकत नाहीं. नियमाप्रमाणे आलेल्या क्रमाने उपसूचना घेतल्या पाहिजेत असा निबंध जेथे आहे, तेथे अध्यक्षाने उपसूचना जशीच्या तशी न मांडू देतां वरीलप्रमाणे भागशः मांडली पाहिजे व मांडावी असे सांगण्याचा त्याला अधिकार आहे. जेथे आलेल्या क्रमाने उपसूचना घेतली पाहिजे असे नाही, तेथे कोणती उपसूचना प्रथम घ्यावी, व ती कशी म्हणजे सर्व अगर भागाने मांडावी, हैं सांगण्याचा त्याला निःसंशय अधिकार आहे. सभेपुढील प्रश्नाची सर्व दृष्टींनी चर्चा होऊन मग सभेचा निर्णय व्हावा या दृष्टीने त्याने उपसूचनांचा क्रम व स्वरूप ठरविले पाहिजे. चर्चेची मर्यादा जिच्या निर्णयाने मर्यादित होईल अशी समावेशक अगर सामान्य उपसूचना प्रथम घ्यावी हे योग्य आहे. तथापि, ज्या उपसूचनेने नाममात्र चर्चा होऊन अनेक दृष्टिकोनांतून होणारी चर्चा टळली जाईल अशी उपसूचना प्रथम घेऊ नये. चर्चेचा उद्देश योग्य व यथासांग चर्चा व्हावी हा आहे. जेथे आलेल्या सर्व उपसूचनांचा विचार एकदम करता येतो, तेथे कांहीच अडचण नाही. प्रत्येक उपसूचना प्रथम औपचारिकरीत्या मांडू द्यावी; व सर्व माडल्यानंतर मूळ प्रश्न व त्यावरील सर्व उपसूचना यावर अध्यक्षाने चर्चा होऊ द्यावी. तथापि मताला टाकतांना सभेचे मताचा विपर्यास न होतां सभेचे खरें मत स्पष्ट होईल अशा रीतीने उपसूचनांचा क्रम ठरवावा व ते ठरवितांना एखादी उपसूचना भागशः मतास टाकण्याचा त्याला अधिकार आहे. समजा, वरील ठरावावरील सर्व उपसूचनांचा व ठरावांचा विचार एकत्र झाला; एकाच वेळीं वेतनी असावा का नसावा, पगार किती असावा, घरभाडे किती असावे याबद्दल चर्चा झाली. मताचे वेळी ‘व वेतनी असावा' एवढे शब्द गाळावेत.एवढाच उपसूचनेचा भाग मतास घालता येईल. तात्पर्य, शक्य तेथे मांडण्याचा क्रम ठरवून अगर मत घेण्याचा क्रम ठरवून सभेचे खरें मत स्पष्ट करून घेण्याचा अधिकार अध्यक्षास आहे. सभेपुढील प्रश्नाला जशी उपसूचना देतां येते तशी सभेपुढे रीतसर आलेल्या