पान:सभाशास्त्र.pdf/184

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७७ सभानियमन व संचालन घेऊन त्यांचा निर्णय घेणे सोईचे व इष्टही असते. बिलाचे कलम असो, ठरावाचा परिच्छेद असो, त्यांतील मजकुरांतील क्रमाप्रमाणे उपसूचनांचा विचार झाला पाहिजे, एक ओळ झाली, पुढील ओळींतील उपसूचनांचा विचार सुरू केला पाहिजे, मग मागील ओळींतील उपसूचनांचा विचार करता येणार नाही, कारण वादाचे पाऊल-चर्चेचे पाऊल-पुढे पडले पाहिजे म्हणून आधींच्या भागांवरील उपसूचना आधीं, नंतरच्या भागांवरील उपसूचना नंतर मांडल्या पाहिजेत, एकाच भागावर अगर एकाच ठिकाणी अनेक उपसूचना असतील तर अध्यक्षाने त्या अशा रीतीने कमीजास्त करून मांडू द्याव्यात की, एक मांडली गेली म्हणून दुसरी मांडतां येऊं नये असे होऊ नये, यासाठी आधींची उपसूचना जशीच्या तशी न मांडू देतां तिचा कांहीं भाग औपचारिक रीतीने मांडू द्यावा, म्हणजे पुढील उपसूचनांना प्रत्यवाय येणार नाहीं. त्यांच्यावर सभेला विचार करता येईल, अर्थात् हा क्रम जेथे एका वेळी एकाच उपसूचनेचा विचार करता येतो असा नियम आहे, तेथेच स्वीकारतां येईल. बिलावरील चर्चेत नियमाप्रमाणे एक उपसूचना मांडावयाची, तिचा निकाल लागला म्हणजे दुसरी, असा निर्बध आहे तेथे अध्यक्षाने वरीलप्रमाणे व्यवस्था करून पुढील कोणतीही उपसूचना विचारांतून बाद होऊ नये म्हणून प्रत्येक सूचनेतील भाग त्या दृष्टीने पृथक् करून मांडण्यास सांगावें. समजा, एका वेळी एकच उपसूचना विचारांत घ्यावयाची आहे व सभेपुढील प्रश्न ‘संस्थेला एक अधिक कार्यवाह असावा व तो वेतनी असावा; त्याला रु. ६० पगार व रु. १० घरभाडे असावे हा आहे. पहिली उपसूचना 44 व तो वेतनी असावा' हे व पुढील सर्व शब्द गाळून टाकावेत' ही आहे. दुसरी उपसूचना ६ रु. ६०'चे ऐवजी रु. ५०' हे शब्द घालावेत' अशी आहे. पहिली उपसूचना जशीच्या तशी मांडू दिली तर पगार कमीजास्त असावा अगरं घरभाडे कमीजास्त असावं अशा अर्थाच्या उपसूचना, जर पहिली पास झाली तर येऊच शकत नाहींत. केवळ पहिली नोटिशीनें प्रथम आली म्हणून जशीचे तशी मांडलीच पाहिजे असें नाहीं. अध्यक्षास सभेचे खरे मत योग्य रीतीने स्पष्ट करून घेण्याचा अधिकार आहे; म्हणून अध्यक्षाने प्रथम पहिल्या सूचनेतील पहिला भागच मांडू दिल्यास अयोग्य नाहीं. ६ ‘व तो वेतन असावा' हे शब्द गाळावेत ? एवढा भाग औपचारिक रीतीने मांडण्यास सांगणे योग्य आहे. सदरह शब्द स.०० १२