पान:सभाशास्त्र.pdf/183

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र १७६ ތކރވސނވފއވސކމތގއވހށއފ ރހޅވމފރރރ. अथाचे शब्द असणारी कोणतीही उपसूचना सभेचा निर्णय लक्षांत घेतां आणता येणार नाही म्हणून जे शब्द उपसूचनेने घालण्याचा अगर जोडण्याचा प्रयत्न असेल ते शब्द सभेने, एकदा जे शब्द गाळावेत असा निर्णय घेतला असेल, तसेच अगर त्याच अर्थाचे असल्यास जोडतां अगर घालता येणार नाहींत. अशी उपसूचना गैरलागू ठरते. या दृष्टीने ‘व त्याला संस्थेचे कामाबद्दल कांहीं पुरस्कार द्यावा अशी उपसूचना वरील ठरावास आल्यास ती गैरलागू होईल; कारण‘ब तो वेतनी असावा' हे शब्द गाळणारी उपसूचना पास करून झालेल्या निर्णयाविरुद्ध ती आहे, दोहोंतील अर्थ एकच आहे. | सभेपुढील विषय अगर प्रश्न विचारांत घेतला जाऊ नये म्हणून ‘सभातहकुबी, चर्चातहकुबी, पूर्वप्रश्नसंचना, तसेच लोकमत अंदाजासाठी बिल फिरतीवर घालावे, या सर्व सूचना कालहरण करणाच्या (Dilatory ) स्वरुपाच्या असतात. म्हणून त्यांचा उद्देश लक्षात घेतां त्यांच्यावरील चर्चेत मुख्य विषयावर जशी चर्चा करता येत नाही, त्याच दृष्टीने असल्या सूचनांना उपसूचना पण आणता येत नाहींत. उद्देश कालहरण करण्याचा आहे, म्हणून त्यावर सरळ होय अगर नाहीं असें सभेचे स्पष्ट मत पडणें जरूर असते. संभातहकुबी अगर चर्चातहकुबी अमुक कालपर्यंत व्हावी असा निर्देश सूचनेतच असला तर, कालाबद्दल फक्त उपसूचना देता येईल. अन्य कोणतीही उपसूचना लागू ठरः णार नाही. “सभा बिनमुदत तहकूब करावी ही सूचना कालहरण करणारी म्हणून तिला उपसूचना देता येत नाहीं. ती सरळ तशीच पास अगर नापास व्हावी लागते. पण ‘सभा दोन दिवस तहकूब करावी. अशी कालमर्यादा घालून सूचना आल्यास तिला ‘एक तास तहकूब करावी अशी अगर अन्य कोणतीही कालदर्शक उपसूचना देता येते. तसेच सभेचा ठरलेला वेळ संपला तर अमुक दिवशी पुन्हा सभा घ्यावी' या सूचनेला कालदर्शक कोणतीही उपसूचना देता येते’ जी सूचना उघड व स्पष्टपणे कालहरण करणारी आहे ती सरळ मतास घातली पाहिजे, तिला उपसूचना नाहीं. जेथे हा हेतु स्पष्ट नाही अगर अध्यक्षाची तशी खात्री नसेल तेथे, कालदर्शक उपसूचना मांडू देण अयोग्य नाही. अनेक वेळा सभेपढील प्रश्न लांबलचक नाराच असतो. अशा वेळी एक एक परिच्छेद घेऊन त्यावरील उपसूचनांचा विचार करणे व निर्णय घेणे इष्ट असते, इतकंच काय, पण एक एक ओळ घेऊन तिला दिलेल्या उपसूचना विचारांत