पान:सभाशास्त्र.pdf/182

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७५ सभानियमन व संचालन ~~ ~~ कलमवार विचार करून, सर्व विलावर निर्णय घेतलेला असतो. त्या निर्णयाला फिरतीची सूचना ( motion for circulation ) ही गैरलागू ठरते. उपसूचनेने पास झालेला भाग, जरी जसाचे तसा राहत असला तरी, बिलाचे या अवस्थेत ही उपसूचना योग्य ठरत नाही. इतकेच नव्हे तर, बिलांतील कलमांचा व्याप वाढविणारी कोणतीच उपसुचना या अवस्थेत लागू ठरणार नाहीं. घटस्फोटाचे बिल प्रथम विवक्षित भागापुरतें अगर जातीपुरते आणले. कलमवार वाचनाचे वेळी या दृष्टीने त्यांत कांहीं बदल झाला नाही तर तिसरे वाचनाचे वेळीं अधिक जाति अगर भाग त्यांत समाविष्ट करण्याकरतां उपसूचना देता येणार नाही. वास्तविक या उपसूचनेनें पूर्व निर्णयांत बदल नाहीं हे खरे; तथापि निर्णयाचा व्याप वाढविणारी उपसुचना कलमवार वाचनाचे वेळी योग्य ठरली असली; तिसरे वाचनाचे वेळीं नाहीं. योग्य प्रसंगी व योग्य स्वरुपात उपसूचना आणून घेतलेल्या निर्णयांत भर घालतां येते. अन्यथा सभेनें कायम केलेल्या भागांत बदलही नाही. व भरही उपसूचनेने घालतां येणार नाहीं. उपसूचनेने सुचविलेले शब्द घालावेत अगर जोडावेत असा सभेने निर्णय दिल्यानंतर त्यामध्ये घातलेल्या अगर जोडलेल्या शब्दांना दुरुस्ती सुचविणारी उपसूचना मांडता येणार नाही. कारण सुचविलेले शब्द मूळ प्रश्नांत असावेत हा निर्णय सभेने घेतलेला असतो म्हणून त्या निर्णयाला पुन्हा उपसूचना नाहीं. ‘संस्थेला एक अधिक कार्यवाह असावा' हा ठराव; याला ८ ‘कार्यवाह या शब्दापुढे पुढील शब्द घालावे व तो वेतन' 'ही उपसूचना आली व ती पास झाली म्हणजे सभेचे मत निश्चित झाले. “व तो वेतन' हे शब्द असावेत हा निर्णय बदलणारी उपसूचना मग गैरलागू आहे. १६ तो व ‘वेतनी' या शब्दांमध्ये “निर्’ शब्द घालावा” ही उपसूचना मग गैरलागू आहे. सभेने स्वीकारलेल्या शब्दांना उपसूचना देता येणार नाही. मात्र निर्णय कायम ठेवून अधिक शब्द जोडणारी व निर्णयाला विरोधी अगर विसंगत नसणारी उपसूचना मांडता येते. व त्याला योग्य घरभाडे द्यावें ही उपसूचना मांडतां येईल. कारण यामुळे निर्णय बदलत नाहीं, अगर त्याला विसंगत असे यांत कांहीं नाहीं. समजा, ठराव संस्थेला एक अधिक कार्यवाह असावा व तो वेतनी असावा असा आहे. याला ६ ‘व तो वेतनी असावा' हे शब्द गाळावेत, अशी उपसूचना आली व ती पास झाली. याचा अर्थ हे अगर अशा