पान:सभाशास्त्र.pdf/180

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७३ सानियमन व संचालन कामगार, मध्यमवर्ग व गरीबवर्ग, यांचे अधिक अधिक शोषण होत जाऊन, त्यांच्या दुःखांत व दारिद्यांत भर पडेल; म्हणून देशाच्या व बहुजनसमाजाच्या स्वातंत्र्यासाठी व हितासाठीं, ही सभा सदरहु सुधारणांचा धिक्कार करीत आहे व देशाला असा आदेश देत आहे की, त्यावर देशाने बहिष्कार टाकावा' या ठरावांत अनेक विधाने आहेत. प्रत्येक विधानावर उपसुचना येऊ शकतात. तथापि आलेल्या उपसुचनांपैकी ज्या क्रमाने विधाने मूळ ठरावांत आहेत त्या क्रमानें त्यांना लागू पडणाच्या उपसूचना मांडल्या गेल्या पाहिजेत. पहिल्या विधानावरील उपसूचना प्रथम मांडल्या पाहिजेत. सुधारणांनी प्रगति होणार नाही, हे पहिले विधान, त्यावरील उपसूचना प्रथम, सुधारणांनी प्रतिगामी लोकांच्या हातांत सत्ता जाऊन गरिबांचे दुःखांत भर पडेल, हे दुसरें विधान; त्यावरील सूचना नंतर मांडल्या पाहिजेत. स्वातंत्र्याचे दृष्टीने त्यांचा धिक्कार हे तिसरें :विधान व बहिष्काराचा आदेश में चौथे विधान. त्यांच्यावरील उपसूचनाही त्याच क्रमाने मांडल्या पाहिजेत. पुढील भाग उपसूचनेने दुरुस्त झाला अगर त्या भागांवरील उपसूचना सभेपुढे चर्चेस आली म्हणजे, मागील भागांवर उपसूचना मांडणे गैर आहे. नुसती उपसूचना मांडली गेली असेल तर ती सभेच्या संमतीने परत घेऊन पहिल्या भागाला अगर मागील भागाला उपसुचना सुचविता येईल. तथापि यालाही मर्यादा आहे. ज्या भागाला उपसूचना सुचविली गेली, त्या भागांवर सभेचे मत प्रदर्शित झालेले नसले पाहिजे. वरील उदाहरणांत, समजा, पहिल्या विधानावर ६ ‘अपु-या व ‘अर्धवट' याऐवजी ‘संपूर्णपणे' हे शब्द घालावेत ही उपसूचना प्रथम मांडली गेली व पास झाली. त्यानंतर दुस-या विधानावर उपसूचना नाहीं व तिस-यावर एखादी उपसूचना आली तर मग दुस-या विधानावर उपसूचना सुचविता येणार नाहीं. ती सुचवावयाची असेल तर, सभेपुढे असलेली उपसूचना परत घेतली गेली पाहिजे. ती परत घेतली गेली म्हणजे दुस-यावर उपसूचना सुचविता येईल. मात्र पहिल्या विधानावर ती देता येणार नाही. कारण त्यावर सभेचे मतप्रदर्शन, त्याला सुचविलेली उपसूचना पास होऊन झालेले आहे. तात्पर्य, जेवढ्या भागावर मतप्रदर्शन झाले असेल, त्यावर उपसूचना नाहीं. उपसूचना पास झाल्याने मतप्रदर्शन होतें, नुसती मांडल्याने नव्हे. म्हणून नुसती मांडली असेल तर ती परत घेऊन मागील भागावर जर