पान:सभाशास्त्र.pdf/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र १७२ - सभाकार्य उपसूचनेनें अगर ठरावानेही थट्टेचा अगर अवहेलनेचा विषय होऊ देणे इष्ट नाहीं. संस्थेचे वाढते कार्य लक्षात घेतां एक अधिक कार्यवाह असावा व तो वेतनी असावा!' या ठरावाला व त्याला रु. २०० वेतन, रु. १०० टांगाभाडे व रु. ५० भत्ता असावा व जरूर असेल तेथे रु. ५० घरभाडे द्यावें ही उपसूचना गरीव संस्थेच्या सभेत सुचविली तर तिच्यामागील भाव लक्षात घेतां अध्यक्षाने न स्वीकारणेच इष्ट ठरते. * १४ वर्षांखालील मुलगी व १६ वर्षांखालील मुलगा हें मूल होय.” मूल याची व्याख्या करणे अवश्य आहे; कारण मुलाचे लग्न केल्यास तो गुन्हा ठरावयाचा आहे. या परिस्थितींत वर सुचविलेल्या व्याख्येला १४ चे ऐवजी ३४ हा आंकडा घालावा अगर * १६ चे ऐवजी ६ आंकडा घालावा' या उपसूचना आल्यास अगर अशाच भावनेने इतर कांहीं उपसूचना आल्यास, अध्यक्षाने त्या विचारांत न घेणे हेच योग्य आहे. “चर्चा तहकूब करावी या सूचनेला चर्चेत सभासदांनीं प्रगट केलेले दिव्यज्ञान लक्षात घेतां वारंवार आणलेल्या तहकुब्या लक्षात घेता, सरकारने इतकी लायक व आदर्श नगरपालिका ठेवणे इष्ट नाही म्हणून, ती रद्द करण्याकरितां अवश्य तो वेळ मिळावा म्हणून ही उपसूचना तीव्र मनोभावना व्यक्त करणारी व कदाचित् । समर्थनाय भावनेने केली असली तरी, सभेपुढे येऊ देणे अयोग्य आहे. सभ्य भाषेत आहे एवढ्याने ती लागू ठरणार नाही, योग्य ठरणार नाही. भाषा, भाव व प्रयोजकता लक्षात घेऊन अयोग्य उपसूचना न स्वीकारण्याचा अधिकार अध्यक्षाला सर्वत्र आहे व तसा असणे इष्ट आहे. येथपर्यंत सांगितलेल्या मर्यादा संभाळून एकाच प्रश्नाला अगर विषयाला अनेक उपसूचना सुचवितां येतात. उपसूचना कशा मांडल्या जाव्यात व त्यांच्यावरील मतमोजणी कोणत्या क्रमाने व्हावी हे योग्य रीतीने ठरविणे अत्यंत इष्ट असते. पुष्कळ वेळां सभेपुढील प्रश्न एक लांबलचक, अनेक परिच्छेदांचा ठरावही असू शकेल, विलाचे अनेक परिच्छेदांनी युक्त असे परिशिष्ट असेल, अशा वेळी प्रश्नांतील अनेक भागांवर अनेक उपसूचना येण्याचा संभव असतो. अशा वेळी उपसूचना पास झाली असतां, ज्या क्रमाने ती मूळ प्रश्नति दुरुस्ती करील त्या क्रमांत उपसूचना मांडल्या पाहिजेत, 4 जाहीर केलेल्या सुधारणा अपु-या, अर्धवट, असंतोषकारक आहेत; त्यांनी देशाची प्रगति होणार नाही, उलट प्रतिगामी लोकांच्या हातांत सत्ता जाऊन शेतकरी,