पान:सभाशास्त्र.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र १०

~ निमंत्रकः-घटनानुरोधानें कामकाज करणाच्या संस्थांचे नियमांत, कोणीं सभा बोलवावी, कोणीं अध्यक्ष व्हावें कामकाज कसे चालावे याबद्दल व्यवस्था सांगितलेली असते. सार्वजनिक सभा कोण बोलवावी याला घटनात्मक असे नियम नाहींत. तथापि, सर्वमान्य परंपरेनें प्रतिष्ठा पावलेले असे संकेत आहेत व त्यांना नियमांची पदवी पण प्राप्त झालेली आहे. काही संस्थांचे घटनेतून सार्वजनिक सभा बोलाविण्याची व्यवस्था असते. त्या संस्थेने सार्वजनिक सभा आपले नियमाप्रमाणे बोलाविली पाहिजे. सार्वजनिक सभेच्या विषयाच्या अनुरोधाने साधारणपणे निमंत्रक कोण हे आपोआप ठरते. समाजांत धर्म, राजकारण, व्यापार वगैरे नानाविध विषयांत लक्ष घालणा-या संस्था व नागरिक असतात; व यामुळे ज्यांच्या हितसंबंधाचा विषय असेल त्या संस्था अगर व्यक्ति सभा बोलाविण्याचे कामी पुढाकार घेत असतात. शारदाबिलाचा विचार करणे असेल तर स्त्रियांच्या संस्था, धर्मसंस्था वगैरे पुढाकार घेतील. स्वतंत्र मतदारसंघ हा विषय असेल तर राजकीय संस्था व पक्ष पुढाकार घेतील, विषयाशी संबंध असलेले नागरिक पण पुढाकार घेऊ शकतात. पुढाकार घेऊन सार्वजनिक सभा बोलावण्याचा हक्क प्रत्येक नागरिकाला आहे. तथापि सभेचा खर्च, तेथील व्यवस्था, वगैरेच्या दृष्टीने कोणी तरी जबाबदार व्यक्तींनी प्रथम एकत्र येऊन विचार व व्यवस्था करून ती बोलाविणे इष्ट असते. असे केल्याने अव्यवस्था व अडचणी टाळता येतात. बैठकी नसणे, जागेची परवानगी घेतलेली नसणे, वक्ते ठरविलेले नसणे, दिवाबत्तीची सोय नसणे, श्रोतृवृंदही प्रसंग नसणे हे प्रकार टाळावेत म्हणून पूर्वयोजना असणे इष्ट आहे. निमंत्रणाची प्रसिद्धिः–जाहीर आमंत्रण में सार्वजनिक सभेचें एक प्रमुख लक्षण आहे. व्यक्तिशः दहापांच माणसांना बोलावून केलेली सभा सार्वजनिक होऊ शकत नाहीं. जाहीर निमंत्रणाचे अनेक प्रकार आहेत. तथापि कुठल्याही त-हेने जाहीर निमंत्रण केलेले असो, त्यांत सभेचा विषय, जागा व वेळ यांचा समावेश अवश्य असला पाहिजे. (१) हस्तपत्रके काढून निमंत्रण करता येते. हस्तपत्रकांत विषय, जागा, वेळ या तीन गोष्टी असल्या पाहिजेत व सभेच्या आधी ती सर्वत्र वाटली पाहिजेत. केवळ हस्तपत्रके छापली एवढ्याने, ती योग्य वेळी व योग्य ठिकाणी वाटली असे होत नाहीं. वजनदार संस्था अगर व्यक्तींची नांवें सभा बोलविणारे म्हणून हस्तपत्रकांवर असली तर सभेला अधिक महत्त्व येते; व हस्तपत्रके वाचून सहसा फेकली जात