पान:सभाशास्त्र.pdf/177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र १७० तसेच जो परिणाम मूळ प्रश्नाला विरोध करून, त्याविरुद्ध मत दिल्याने होईल, तेवढाच परिणाम करणारी उपसूचना ही गैरलागू आहे. 4 या सभेचे सत असे आहे की, एकंदर परिस्थितीचा विचार करत सुधारणा स्वीकाराव्यात या ठरावाला ८ ‘स्वीकाराव्यात' या शब्दाऐवजी स्वीकारू नयेत' हे शब्द घालावेत;' ही सूचना गैरलागू आहे. उपसूचना देऊन जो परिणाम होणार तोच व तेवढाच परिणाम मूळ प्रश्नाविरुद्ध मत देऊन होणार आहे. सभेने मूळ ठराव नापास केला अगर ही उपसूचना स्वीकारून दुरुस्त ठराव पास केला तरी परिणाम सारखाच होतो. या परिस्थितीत वरील उपसूचना अनावश्यक आहे. सभेपुढील प्रश्नावरील मतप्रदर्शनार्थ तिची आवश्यकता नाही म्हणून ती गैरलागू आहे. सरळ नकारात्मक अगर वस्तुतः नकारात्मक द मताचे दृष्टीने केवळ नकारात्मक परिणाम करणारी उपसूचना, गैरलागू आहे. ‘वेतनी कार्यवाह असावा व त्यास रु. ५० मासिक वेतन असावे' हा ठराव - ‘असावे' ऐवजी ‘नसावे' हा शब्द घालावा ही उपसूचना सरळ सरळ गैरलागू आहे. १८ वेतनी' हा शब्द गाळावा व ‘कार्यवाह’ असावा या । पुढील सर्व शव्द गाळून पुढील शब्द घालावेत, ‘वेतनाची प्रथा अनिष्ट असलेमुळे ती नसावी' ही उपसूचनाही वस्तुतः नकारात्मक आहे. मूळ प्रश्नाला वस्तुतः नकारात्मक आहे म्हणून ती गैरलागू आहे. उपसूचनेने होणारे कार्य मूळ प्रश्नाला विरोध करूनही होणारे आहे. । उपसूचना ही झालेल्या निर्णयाशी विसंगत नसावी. जसा एकदा सभेने केलेला निर्णय त्याच सभेत अगर विविक्षित कालांत दुसरा ठराव आणून बदलता येत नाही, तसेच उपसूचनेनेही सभेने घेतलेला निर्णय त्याच सभेत अगर विविक्षित काल बदलता येत नाही. सभेने घेतलेला निर्णय ठरावाने असो अगर उपसूचना नापास करून घेतलेला असो तो ठरावानें अगर उपसूचनेनं बदलता येत नाही. एकदा एका विषयावर उपसूचना आली, ती नापास झाली की त्याच विषयावर पुन्हा त्याच अर्थी उपसूचना आणता येणार नाहीं. घेतल्या गेलेल्या निर्णयाला व्यापक स्वरूप देणारी अगर त्यांत भर टाकणारी उपसूचना आणतां येते, कारण असली उपसूचना पूर्वीचा निर्णय बदलत नसून, तो मान्य करून काम करणारी असते. जो विषय सभेपुढे चाचला जाऊन, सभा ज्यावर मतदान करून निर्णय देते, तेवढाच विषय निर्णित झाला असे मानले जाते. सदरहू विषयाला आनुषंगिक अगर