पान:सभाशास्त्र.pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६९ सभानियमन व संचालन उपसूचना विषयाला धरून असून प्रश्नाचे क्षेत्रांत ती पडणार नाही तर ती गैरलागू ठरते. “शिल्लकी रकमेतून सार्वजानिक उपयोगासाठी क्रीडांगणे करावींत' या ठरावाला ८८ रकमेतून' या शब्दापुढे ‘जरूर पडल्यास एक टक्का घरपट्टी वाढवून' हे शब्द घालावेत; ही उपसूचना गैरलागू आहे. शिलकी रक्कम कशी खर्च करावी इतकीच मर्यादा प्रश्नाची आहे म्हणून कर बसवून मांडलेली योजना पुरी करावी ही उपसूचना अयोग्य आहे. सार्वजनिक उपयोगासाठी क्रीडांगणे अत्यंत अवश्य आहेत व शिलकी रक्कम खर्च करून ती करावीत' या ठरावाला वरील उपसूचना लागू ठरेल. कारण विषयाची मर्यादा येथे क्रीडांगणांची आवश्यकता ही आहे व ही उपसूचना तेथे मर्यादेत येते; व विषयाला धरून ती आहेच आहे. खर्च कोणत्या बाबींतून करावा हे सुचविणारी कोणतीही उपसूचना तेथे लागू ठरेल. उलट क्रीडांगणे हीच विषयाची मर्यादा असलेमुळे ८ ‘क्रीडांगणें' या शब्दापुढे ‘व शाळागृहें' हे शब्द जोडावेत, ही अगर ह्याऐवजी शाळागहे' हे शब्द घालावेत' ही उपसूचना गैरलागू आहे. कारण मूळ प्रश्नाचे मर्यादेत ती बसत नाहीं. “सार्वजानिक सुखसोईसाठी, क्रीडांगणे, तलाव, उद्याने वगैरे कामें कमिटीने हाती घ्यावीत या ठरावांत सार्वजनिक सुरवसोय ही विषयाची मर्यादा आहे. यांत पडणारी प्रत्येक उपसूचना योग्य ठरेल. तात्पर्य, सभेपुढील प्रश्नाला उपसूचना गैरलागू नसावी व त्याचे मर्यादेत ती असावी. उपसूचना अगर उपसूचनेला सुचविलेली उपसूचना अशी असावी की, सभागृहाने ती मान्य केल्यास दुरुस्त प्रश्न अगर दुरुस्त उपसूचना यांतील अर्थ सहज लक्षांत यावा. जर दुरुस्त प्रश्न अगर उपसूचना अर्थहीन झाली अगर असंबद्ध झाली, तर झालेले सभाकार्य विफल होते. पुष्कळ वेळां मनांत एक असते व उपसूचनेतील शब्दांबाबत काळजी न घेतल्यास भलताच परिणाम होतो. म्हणून उपसूचकाने आपली उपसूचना पास झाली तर प्रश्नाचे स्वरूप कसे राहील हे स्वतः प्रथम पाहावे व ते अपेक्षित आहे व तसा त्यांतून सरळ अर्थ निघतो, याची खात्री करून घेऊन मग उपसूचनेचे शब्द कायम करावेत व ती द्यावी. योग्य -स्वरुपात उपसूचना नसेल अगर अर्थबोध करणारी नसेल तर ती गैरलागू ठरेल व अध्यक्ष स्वीकारणार नाही, अभावात्मक अगर नकारात्मक ती नसावी. तिच्यावरील मतदानाने नकारात्मक अगर अभावात्मक निर्णय सभेचा होईल असे तिचे स्वरूप नसावे.