पान:सभाशास्त्र.pdf/175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

******

सभाशास्त्र १६८ ~~ उपसूचनेने ही गोष्ट करता येत नाही. अधिकारारूढ पक्षावर अगर व्यक्तीवर अविश्वास दाखवावयाचा असेल तर तसा ठराव आणणे योग्य असते. उगाच कुठल्या तरी विषयाचे चर्चेत उपसूचना आणून ही गोष्ट करता येणार नाहीं व करणे योग्य नाहीं. सभातहकुबीवर, चर्चातहकुबीवर, तहकुबीला अप्रस्तुत अशी उपसूचना चालणार नाही. * कार्यकारी मंडळाचे कार्य नापसंत आहे म्हणून' ही उपसुचना “ सभा तहकूब करावी' या सूचनेला गैरलागू आहे. तात्पर्य, सभेपुढील प्रश्नाला नियमाप्रमाणे उपसुचनेतील मजकूर उपसूचनेच्या रूपाने देतां आला पाहिजे. सभेपुढील प्रश्नाला धरून उपसूचना असली पाहिजे, याचा अर्थ समेपुढील प्रश्नांत व उपसूचनेत कांहीं तरी सामान्य असे पाहिजे. प्रश्नांतील विषयाशी असंबद्ध असा विषय उपसूचनेने सुचविता येणार नाहीं. ‘कमिटीने सार्वजनिक उपयोगासाठी मध्यवर्ती क्रीडांगणे तयार करावीत व त्यासाठी अमुक जागा खाजगी खरेदीने अगर सरकारमार्फत घ्याव्यात या ठरावाला ‘निम्मी क्रीडांगणे शहराचे पूर्व भागांत व्हावीत अशा रीतीने जागा घ्याव्यात' हे शब्द “अमुक जागांऐवजी घालावेत' ही उपसूचना योग्य आहे. तसेच उपयोगासाठी यापुढे ‘तलाव व असे शब्द घालावेत हीही उपसूचना गैरलागू नाहीं. ठरावांतील विषयाचा भाव व्यायामाची सार्वजानिक सोय हा आहे. त्याला धरून जी उपसूचना असेल ती योग्य ठरेल. ८८ मध्यवर्ती क्रीडांगणे हे शब्द गाळून त्या ठिकाणी शाळा, देवळे अगर सभागृहे' हे शब्द घालावेत ही उपसूचना गैरलागू होईल, विषयाला धरून पण ठरावांत सुचविलेल्या योजनेला सर्वस्वीं सोडून अशी दुसरी योजना उपसूचनेने मांडतां येईल. ‘सालमजकुरीं शिल्लक राहिलेल्या रकमेतून सार्वजनिक उपयोगासाठी क्रीडांगण तयार करावीत' हा ठराव आला तर, यांतील विषयाचा भाव शिल्लक रकमेंतून सार्वजानिक उपयोगासाठीं कांहीं खर्च करावा, शिल्लक तशीच ठेवू नये हा आहे. म्हणून या ठरावाला “क्रीडांगणे' हा शब्द काढून त्याऐवजी ‘शाळागृहे’, ‘सभागृहे (अगर अन्य कांहीं सार्वजनिक सोयदर्शक शब्द ) घालावेत,” ही उपसूचना गैरलागू नाहीं. तात्पर्य, सभेपुढील प्रश्नांतील विषयभाव जो असेल त्याला धरून उपसूचना असली पाहिजे. उपसूचना प्रश्नाचे क्षेत्रांत पाहिजे; म्हणजे सभेपुढील प्रश्नांतील विषयाच्या ज्या मर्यादा असतील त्या बाहेरचा विषय उपसूचनेने आणता येणार नाही.