पान:सभाशास्त्र.pdf/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६७ सभानियमन व संचालन गाळावेत अगर शव्द जोडावेत अगर घालावेत अशी उपसूचना असेल तर गाळावेत अगर घालावेत यावरच चर्चा मर्यादित करावी. शब्द गाळून त्या ठिकाणी दुसरे शब्द घालावेत अशी उपसूचना आली असतां, चर्चेचे क्षेत्र अधिक व्यापक होते हैं उघड आहे. सुलभतेच्या दृष्टीने शब्द गाळणाच्या अगर जोडणाच्या उपसूचना प्रथम विचारांत घ्याव्यात व प्रथम मतास टाकाव्यात व नंतर शब्द: गाळून त्या ठिकाणी दुसरे शब्द घालणा-या उपसुचनांचा विचार व्हावा. योग्य क्रमानें चर्चा न झाल्यास अगर मतमोजणी न झाल्यास निर्णयात्मक कांहीच होत नाहीं अगर अर्थहीन निर्णय होतो. वरच्या ठरवांत ८८ ८ राबवाव्यात' हा शब्द गाळून ‘अनिष्ट आहेत' हे शब्द घालावेत” अशी आणखी एक उपसूचना आली; सर्वच उपसूचना एकाच वेळी चर्चिल्या गेल्या व योग्य क्रम मताचे वेळी ठेवला गेला नाही तर, पहिली उपसूचना पास होऊन, दुसरी व तिसरी नापास होऊन वरील चौथींतील ‘राबवाव्यात हा शब्द राहूं नये असे सभेचे मत पडून ‘अनिष्ट आहेत. हे सुचविलेले शब्द जोडू नयेत असेही मत पडेल; आणि सग सभेचे पुढे मूळ प्रश्नातील " या सभेचे असे मत आहे की, देशहिताचे दृष्टीने एवढाच भाग राहील. पुढील सभा ता. ३ रोजी बोलवावी' याला “ता. ३ रोजी' हे शब्द गाळून त्याऐवजी *७ दिवसांची नोटीस देऊन' हे शब्द घालावेत ' अशी उपसूचना आली. * गाळावे म्हणून सुचविलेले शब्द' राहू नयेत असा सभेने निर्णय दिला व सुचविलेले शब्द घालू नयेत असा निर्णय दिला म्हणजे पुढील सभा बोलवावी' एवढाच प्रश्नाचा भाग सभेपुढे शिल्लक राहतो व तो मतास टाकून पास झाला तरी तो निर्णय अर्थहीन होतो. अनेक प्रसंगी अशी परिस्थिति सुद्दाम सभासद् घडवून आणतात व सभाकार्य विफल करतात. निर्णयासाठी जमलेली सभा न निर्णय घेतां अगर निरर्थक निर्णय घेऊन संपते. चर्चेचे नियमन व उपसूचनांवरील मत-प्रदर्शन, योग्य क्रमाने घेतल्याने असले प्रसंग टळतात व सभेपुढील कार्याचा विचका होत नाहीं. | सभेपुढे येणारी उपसूचना सभेपुढील प्रश्नाला धरून असली पाहिजे. प्रश्नाचे क्षेत्रांत ती पडणारी असली पाहिजे. तसेच उपसूचनेतील विषय नियमाप्रमाणे उपसूचनेने मांडतां येण्याजोगा असला पाहिजे. सभाकायचे कांहीं नियम असतात. माहिती पाहिजे असेल तर प्रश्न विचारून ती मिळवावी लागते. सभातहकुबी अगर चर्चातहकुबी ही सूचना मांडून सभेपुढे आणावी लागते;