पान:सभाशास्त्र.pdf/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ससाशास्त्र १६६ مجھے مي ممي مي होतो. मतदानांत सुलभता निर्माण होते. जेथे उपसूचना नुसती ‘शब्द घालावेत' अगर ‘जोडावेत' अशी आहे तेथे अध्यक्षानें “सुचविलेले शब्द घालावेत अगर जोडावेत' यावर मत घ्यावे. हा प्रश्न पास झाल्यास दुरुस्त प्रश्न मतास टाकावा. नापास झाल्यास मूळ प्रश्न जसाचे तसा मतास टाकावा. वरच्या ठरावाला ८ ‘राबवाव्यात' या शब्दापुढे पुढील शब्द जोडावे व त्या यशस्वी होण्यासाठी शक्य तेवढे सहकार्याचे धोरण ठेवावें. ही उपसूचना आली असतां ‘सुचविलेले शब्द जोडावेत हा प्रश्न मतास घालावा. तो पास झाल्यास दुरुस्त प्रश्न मतास घालावा; नापास झाल्यास मूळ प्रश्न जसाचे तसा मतास घालावा. पुष्कळ वेळां सभासद उपसूचना व मूळ ठराव अगर प्रश्न दोहोंचे विरुद्ध असतात, ते दोहोंविरुद्ध मत देतात. तथापि डावपेचाचे दृष्टीने उपसूचनेला वाजूने मत देऊन दुरस्त ठरावाला विरुद्ध मत देणे व तो नापास करणे अधिक श्रेयस्कर ठरते. वरील ठराव ज्यांना पसंत नाही त्यांनी तो अधिक लोकांना नापसंत होईल या दृष्टीने उपसूचनांकडे पाहिले पाहिजे. आहे असा ठराव राहिला तर कित्येक तटस्थ राहतील, कित्येक पहिल्या भागावर खूष होऊन ठरावाला संमति देतील; म्हणून प्रगतिकारक आहेत' वगैरे शब्द घालणारी उपसूचना पास झाली तर ते नाखूष होतील हे उघड आहे. ज्यांना ठराव व सर्वं उपसूचनांना विरोध करावयाचा असेल त्यांनी अशा उपसूचनेला पाठिंबा देऊन ती पास करावी म्हणजे दुरुस्त ठराव जास्तीत जास्त लोकांना नापसंत होईल. उपसूचनेला पसंत म्हणून पाठिंबा नव्हे, तर ती पास होऊन दुरस्त ठराव परिणामकारक रीतीने विरोधितां येईल म्हणून तो द्यावयाचा. उपसूचना पास झाली व दुरुस्त ठराव मतास आला म्हणजे जे उपसूचनेला विरोधक होते ते तर विरोध करतीलच, पण त्यास ज्यांनी वरील दृष्टीने पाठिंबा देिला तेही विरोध करतील. याशिवाय एकंदर ठराव दुरुस्त झाल्यामुळे नाखूष झालेलेही विरोध करतील व अशा रीतीने विरोधी बल वाढत असते, डावपेचाचे दृष्टीने उपसूचनेला दिलेला पाठिंबा हा खरा पाठिंबा नव्हे व तो तसा दिला तर त्यांत गैर काहीं नाहीं. अनेक उपसूचना येतात व मतास घालतांना व चर्चेच्या वेळीही जर योग्य नियमन नसले तर गोंधळ होतो व कांहीं तरी निर्णय होतो, की जो कोणी अपेक्षिलेलाही नसतो. म्हणून चर्चेचे नियमन व्यवस्थित होणे इष्ट आहे. शब्द