पान:सभाशास्त्र.pdf/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६५ समानियमन व संचालन व असंतोषकारक आहेत, तथापि या सभेचे मत असे आहे की, त्या देशहिताचे दृष्टीने राबवाव्यात' हा सभेपुढील प्रश्न, याला ६ जाहीर' शब्दापासून ‘तथापि’ शब्दापर्यंत व तो धरून सर्व शब्द गाळावेत' ही उपसूचना आली असतां अध्यक्षाने गाळावेत म्हणून सुचविलेले शब्द राहावेत यावर मते घ्यावीत. शव्द राहावेत असे सभेचे मत पडल्यास मूळ प्रश्न जशाचे तसा मतास घालावा. शब्द राहू नयेत असे मत पडल्यास तेवढे शब्द गाळून ‘या सभेचे मत' वगैरे भाग तेवढाच मताला घालावा. निव्वळ उपसूचनेला मोघम अनुकूल, प्रतिकूल कोण असा प्रश्न विचारू नये. अनेक सभांतून निव्वळ ‘अमुक शब्द गाळावेत, ही उपसूचना आहे' असे अध्यक्ष सांगतो व त्यावर मते घेतो हाही प्रकार गैर नाही; पण ‘गाळावे म्हणून सुचविलेले शब्द राहावेत' असा प्रश्न सभेपुढे मांडल्याने सभेला परिस्थिति अधिक स्पष्ट होते. कॉमन्स सभेमध्ये व बहुतेक विधिमंडळांतून हीच रीत आहे. उपसूचना जर शब्द गाळून त्या ठिकाणी दुसरे शब्द. घालावेत अगर जोडावेत अशी असेल तर, अध्यक्षाने ‘गाळावेत म्हणून सुचविलेले शब्द राहावेत' हा प्रश्न सतास घालावा.. सभेने तो मान्य केला तर मूळ प्रश्न जसाचे तसा मतास घालावा. सभेने जर ‘गाळावेत म्हणून. सुचविलेले शब्द राहावेत' हा प्रश्न नापास केला तर “सुचविलेले शब्द घालावेत अगर जोडावेत' हा प्रश्न मतास घालावा. तो पास झाला म्हणजे हे सुचविलेले शब्द घालून अगर जोड़न मुख्य प्रश्न-दुरुस्त प्रश्न-मतास घालावा. वरच्या ठरावाला जाहीर' शब्दापासून “तथापि' शब्दापर्यंत तो धरून सर्व शब्द गाळावेत व त्या ठिकाणी ‘देशाचे विद्यमान स्थितीत दिलेल्या सुधारणा प्रगतिकारक आहेत म्हणून हे शब्द घालावेत, व ‘राबवाव्यात' या शब्दापुढे पुढील शब्द जोडावे. त्या यशस्वी होण्यासाठी शक्य तेवढे सहकार्याचे धोरण ठेवावे.” अशी उपसूचना आली असतां प्रथम ‘गाळावेत म्हणून सुचविलेले शब्द राहावेत' हा प्रश्न मतास टाकावा. तो नापास झाल्यास ‘सुचविलेले शब्द घालावेत अगर जोडावेत' हा प्रश्न मतास टाकावा व तो पास झाल्यानंतर दुरुस्त प्रश्न मतास टाकावा; ही श्रेष्ठ पद्धत आहे. अध्यक्षाने असली उपसूचना वाचून एकदम ती जशीच्या तशी मतास टाकल्यास सभेला सर्व परिस्थिति स्पष्ट होत नाहीं, गैर नसले, नियमाविरुद्ध नाहीं असे जरी असले तरी अशा रीतीने मतास टाकणे इष्ट नाहीं. थोडा वेळ पहिल्या पद्धतींत अधिक लागला तरी त्यापासून फायदाच