पान:सभाशास्त्र.pdf/171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र १६४

नियम आहे. वक्त्याचे बोलणे चालू असतां त्याला खंडित करून उपसूचना मांडता येणार नाही. चालू भाषण संपलें म्हणजेच भांडतां येते. सामान्यतः अध्यक्षाने उपसूचना औपचारिक रीतीने मांडू द्याव्यात व नंतर आमचर्चेला मोकळीक द्यावी. योग्य क्रमाने उपसूचकासही पाचारण करावे. जेथे उपसूचना एकएक घेऊन निकाली लावणे जरूर असते तेथेसुद्धां अध्यक्षाने पाचारण केल्याशिवाय उपसूचना मांडता येणार नाहीं. : कार्यक्रमपलिकेवर उपसूचना छापलेल्या असतात. त्या क्रमाप्रमाणे उपसूचकाने उभे राहिले पाहिजे म्हणजे अध्यक्ष त्यास पाचारण करतो. क्रमांक येतांच उपसूचक उभा राहणार नाही, अगर गैरहजर असेल तर त्याचा हक्ष गेला. त्याला मग ती उपसूचना मांडतां येणार नाही. विलावरील चर्चेत अनेक उपसूचना येतात व त्या जशा आल्या असतील त्या क्रमाने अध्यक्ष त्या घेतो. त्यात बदल करावयाचा असल्यास सभेचे संमतीनें तो करतो. । उपसूचनेला अनेक संस्थांतून व विशेषतः विधिमंडळांतून अनुमोदन लागत नाहीं. जेथे या बाबतीत नियम नसेल तेथे अनुमोदन असावे हे इष्ट आहे व तसा प्रघातही आहे. अगदी औपचारिक स्वरुपाची अगर शाब्दिक उपसूचना असेल तर अनुमोदनाची जरुरी नाहीं. अनुमोदन नाही म्हणून उपसूचना गळून पडण्यापेक्षा तिजवर चर्चा होऊन ती नामंजूर झाली तर निर्णयात्मक गोष्ट होते म्हणून महत्त्वाचे व योग्य प्रसंगीं अनुमोदनाशिवाय नियमभंग होत नसेल तर उपसूचना मांडू देणे धोरण ठरते. उपसूचनांचे स्वरूप त्रिविध असते. (१) मूळ प्रश्नांतील शब्द गाळणे. (२) शब्द गाळून त्याऐवजी दुसरे घालणे. ( ३ ) अधिक शब्द घालणे अगर जोडणे, | मूळ प्रश्नांतील कांहीं शब्द गाळावेत अशी वे एवढीच उपसूचना असेल त्या वेळी अध्यक्षाने मताचे वेळी मुख्य प्रश्न वाचावा व अमुक शब्द गाळावेत ही उपसूचना आली आहे असे सांगून 4 गाळावेत म्हणून सुचविलेले शब्द राहावेत हा प्रश्न मतास टाकावा. सभेने ते राहावेत असा निर्णय दिल्यास मूळ प्रश्न जसाचे तसा सभेला पसंत आहे हे उघड होते. अध्यक्षाने मग तो मूळ प्रश्न सभेपुढे मतास घालावा. जर ‘गाळावेत म्हणून सुचविलेले शब्द राहावेत' हें सभेने नापास केल्यास अध्यक्षाने मूळ प्रश्नांतील ते शब्द गाळून राहिलेला भाग मतास घालावा. “जाहीर केलेल्या सुधारणा अपु-या, अर्धवट