पान:सभाशास्त्र.pdf/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ससाशास्त्र १६२ कमी होते. उपसूचनेचा उद्देश प्रश्नांत बदल करून जे, बदल झाला नसता तर तटस्थ राहिले असते अगर विरोध केला असता अशांना, बदल करून दुरुस्त प्रश्नाचे बाजूस आणणे हा असतो. सभेपुढे प्रश्न आला म्हणजे त्याला मान्यता देणारे, विरोध करणारे, तटस्थ राहणारे असे वर्ग असतात. उपसूचनेतील प्रश्नांत दुरुस्ती सुचवून तटस्थ व विरोधी वर्गातून प्रश्नाचे बाजूस जास्तीत जास्त अनुकूल मत करून घ्यावयाचे असते. अशा त-हेचा बदल सुचविणारी उपसूचना नसेल तर तटस्थ राहतील व विरोधी विरोध करतील अगर स्वतःची अंशी विकल्पी सूचना (alternative proposition ) सभेपुढे आणतील, अंशी विकल्पी सूचना की, जिचे स्वरूप मूळ प्रश्नाशी सर्वशः अगर अंशतः विरोधी आहे, मूळ प्रश्नांतील औपचारिक शब्द ठेवून बाकीचे गाळून त्याऐवजी या सूचनेतील शब्द घालावेत, अशी उपसूचना देऊन सभेपुढे मांडप्यांत येते. सभेपुढे मग वादविवादासाठी, विचारासाठी मूळ प्रश्न व ही विकल्पी सूचना अशा दोन गोष्टी असतात. मग त्यांतून एकाची निवड करावी लागते. दोहोंत समन्वय होऊ शकत नाहीं. ६ राष्ट्रसंघाच्या शिफारसी विचारांत घेऊन सभागृह असे मत प्रदात करते की, कांचकारखान्यांतील मजुरांबाबतच्या शिफारसी अमान्य आहेत. या ठरावाला ८६८ मत प्रदर्शित करत कीं, येथपर्यंतचे शब्द कायम ठेवून पुढील शब्द गाळावेत, व त्याऐवजी पुढील शब्द घालावेत. “कांचकारखान्यांतील मजुरांबाबतच्या शिफारसी मान्य असून त्या अंमलात आणण्यासाठी सरकारने जरूर ते कायदे ताबडतोब करावेत' ' अशी उपसूचना आली म्हणजे दोन विकल्प, दोन योजना सभेपुढे विचारासाठी असतात. यांतून एकाची निवड करावयाची असते. यांत समन्वय होऊ शकत नाही. साध्या उपसूचनेचा उद्देश असे विकल्पी उपसूचनेचे प्रसंग टळून मुख्य सूचनेचे बाजूस विरोधी व तटस्थ यावेत हा असतो. विकल्पी उपसूचना मान्य केली तर मूळ प्रश्न ऐनजिनसी नाहीसा होतो, ती अमान्य केली तर मूळ प्रश्नाला उपसूचनावाल्यांचा विरोध राहूनही तो पास होता. अन्य उपसूचना म्हणजे समन्वय करण्याचे प्रयत्न म्हटले तरी चालेल. उपसूचना या सभेपुढील प्रश्नाला असतात. सभेपुढे येणा-या प्रश्नाबाबत नियम बहुतेक संस्थांतून असतात, त्याचप्रमाणे उपसुचनाबाबतही असतात. काही संस्थांतून उपसूचनेची आगाऊ नोटीस द्यावी लागते व किती काल आगाऊ दिली पाहिजे हेही त्या नियमांत असते. उपसुचनेला उप