पान:सभाशास्त्र.pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

साशास्त्र १६० ཀ ཀ ཀ བཀའ བདར བཀ अध्यक्षास आहे. त्याने आज्ञा केल्यासच उपसूचकास तसा खुलासा करतां येईल. योग्य ती निवड करण्याचे दृष्टीने ही योजना इष्ट अशीच आहे. निवड केल्यानंतर निवडलेल्याच उपसूचना मांडतां येतात व त्यावरच चंच होते व त्यावरच मतमोजणी होते. न निवडलेल्या सर्व उपसूचना मग गळतात. वाद होतात. या पद्धतीचे चर्चाबंदसि विनोदानें: कांगारु (Kangaroo) पद्धत म्हणतात. हे जनावर उड्या मारत चालते, तसेच उपसूचनांची निवड सरळ न होतां टप्याटप्याने होते म्हणून हे विनोदी नांवही अयथार्थ नाही. विशिष्ट विषयांना चर्चेसाठी ठराविक काल देऊन ( alloted time) चर्चा मर्यादित करण्याचा जो प्रकार आहे त्याचा उल्लेख पूर्वी येऊन गेला आहे. चर्चा तहकुबीच्या सूचनेवरील वादविवाद दोन तासच चालतो. त्यानंतर तो बंद होतो. अंदाजपत्रकावरील वादविवाद, मागण्यावरील चर्चा ठराविक दिवसांतच संपली पाहिजे. न संपली तर शेवटच्या दिवशी सरळ मतमोजणी होते. चर्चातहकुबी अगर सभातहकुबी अगर अन्य कांहीं अडथळा आणणारी सूचना नियमबाह्य असते. ठराविक काळांत संपणाच्या चर्चायोजनेंतसुद्धां निवडक उपसूचना मांडण्याचा अधिकार अध्यक्षांना असणे इष्ट असते व तसा कॉमन्स सभेत आहे. बजेटांतील मागण्यावर शेकडोंना काट सुचविले जातात. सभागृहांतील पक्षांत समजुतीने कामाची वाटणी होऊन काम झाले तर कांहीं महत्त्वाचे काट चर्चिले जातात. नाहीतर जसे दिले गेले असतील त्या क्रमाने चर्चेस घालणे अध्यक्षास भाग पडते. महत्त्वाचे विषय बाजूला पडण्याचा संभव असतो. या परिस्थितीत अध्यक्षाला निवड करण्याचा अधिकार असल्यास अनिष्ट नाहीं. चर्चाकाल जेथे निश्चित आहे, तेथे त्याचा जास्तीत जास्त चांगल्या रीतीने उपयोग होणे इष्ट आहे. चर्चा मर्यादित व्हावी म्हणून चर्चाकाल ठरविणे जसे इष्ट तसेच त्या काळाचा योग्य उपयोग होईल अशी योजना असणे अगर करणेही तितकेच इष्ट आहे. स्थानिक स्वराज्य-संस्थांच्या अंदाजपत्रकावरील चर्चेला नियमांत जरी कालमर्यादा नसली तरी सभेने ती सुरवातीला घालून घेणे अयोग्य नाहीं. सामान्य चर्चा, बाबवार चर्चा अशी विभागणी करून कार्य केल्याने त्यांत सुलभता निर्माण होते. कोट्यवधि अगर लक्षावधि रुपयांचे बजेट पांच मिनिटांत पास करणे यांत कार्यक्षमता नाही; उलट सार्वजनिक हितावर अन्याय आहे. त्याचप्रमाणें तीन तीन महिने