पान:सभाशास्त्र.pdf/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५९ सभानियमन व संचालन www चर्चाबदाची सूचना आणतां येते त्याच परिस्थितींत सभासदाला * सभेपुढील प्रश्नावरील अगर त्यांतील विशिष्ट भागावरील अगर शब्दावरील उपसूचनांपैकी योग्य ती निवड करून अध्यक्षाने तेवढ्याच मांडण्यास परवानगी द्यावी ही सूचना मांडता येते व ती पास होतांच अध्यक्ष आपल्या खास अधिकारांत उपसूचनांची निवड करतो. या सूचनेवर निदान १०० सभासदांनी बाजूने मते देऊन ती पास झाली पाहिजे तरच हा अधिकार मिळतो, असा कॉमन्स सभेचा नियम अग्हे. अशा त-हेची मर्यादा घालून अगर ती न घालतां निवडक उपसूचना मांडण्यास परवानगी देण्याचा अधिकार अध्यक्षाला असणे इष्ट आहे. असा नियम असल्यास उत्तम; नसल्यास योग्य प्रसंगी सभेने अनुरूप सूचना करून वर दर्शविल्याप्रमाणे तो द्यावा. हा अधिकार व कोणती उपसूचना प्रथम मांडू द्यावयाची, कोणती प्रथम मतास टाकावयाची हा अधिकार यांत फरक आहे. पहिल्यांत चर्चाबंदीची योजना आहे. दुस-यांत केवळ चर्चेचा व मतमोजणीचा क्रम ठरविण्याची योजना आहे. पहिला अधिकार विशिष्ट परिस्थितीत द्यावा लागतो तर दुसरा अध्यक्षाच्या सर्वसामान्य अधिकारांतच तो पडतो. तो देण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीं. इंग्लंडमध्ये अलीकडे पहिला अधिकारही आतां ही सूचना मांडून द्यावा लागत नाहीं (इ. स. १९२९ ). अध्यक्षाला योग्य प्रसंग वाटल्यास त्याप्रमाणे तो जाहीर करून उपसूचना निवडतो व निवडलेल्या उपसूचना ज्यांच्या असतील त्यांना त्या मांडण्यास पाचारण करतो. अधिकार असो अगर दिलेला असो अध्यक्षाने चर्चा मर्यादित होईल, द्विरुक्ति होणार नाही अशा दृष्टीने उपसूचना निवडाव्या व उपसूचकांना मांडण्यास पाचारण करावे. निवड कां केली हे सांगण्याचे कारण नाही. तसेच न निवडलेल्या उपसूचना गैरलागू आहेत असाही निकाल देण्याचे कारण नाहीं. न निवडलेल्या बाजूला टाकल्या जातात. तथापि निवडलेल्या उपसूनांवरील चर्चेनें व निर्णयाने त्यांचाही योग्य परामर्ष घेतला जातो असेच वस्तुतः होते. उपसूचना निवडून काढण्याचे अधिकारांत निवडून काढलेल्या उपसूचनेवरील उपसूचनासुद्धा निवडून काढण्याचा हक्क समाविष्ट आहे. उपसूचनेवरही अनेक उपसूचना येत असतात. गंडस्योपरि पीटिका हा रोग वादविवादांतसुद्धा असतो. उपसूचना अगर त्यावरील उपसूचना निवडून काढतांना उपसूचकास त्याचे उपसूचनेबद्दल खुलासा मागण्याचा, तिचे महत्त्व जाणून घेण्याचा अधिकार