पान:सभाशास्त्र.pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५७ सभानियमन व संचालन ~ १२:४३, २९ मार्च २०१८ (IST)१२:४३, २९ मार्च २०१८ (IST) ~ १२:४३, २९ मार्च २०१८ (IST)१२:४३, २९ मार्च २०१८ (IST)१२:४३, २९ मार्च २०१८ (IST) तोच मतास घालणे न्याय्य आहे. बिलाचे एखादे कलम अगर त्यावरील उपसूचना चर्चाबंदीनंतर पास झाली की कांहीं शाब्दिक अगर अन्य उपसूचना आवश्यक होतात, म्हणून त्या सभेपुढे आलेल्या असतात. मुख्य कलम अगर उपसूचना पास झाल्यानंतर या आनुषंगिक दुरुस्त्यांवर पुन्हा चर्चा होऊ देणे व्यर्थ असते. त्या ताबडतोब मताला घातल्या जाणेच इष्ट असते. हत्ती विकल्यानंतर अंकुशाबद्दल घासाघीस व्यर्थच मानली पाहिजे. सभेमध्ये एक पक्ष सभेपुढील प्रश्नाचा निकाल लावण्याची खटपट करीत असतो व पुष्कळ वेळां विरोधी पक्ष सभाकाल संपेपर्यंत त्यावरील चर्चा लांबविण्याचा प्रयत्न करीत असतो. चर्चाथै तहकुबीच्या सूचनेवरील वादविवाद दोन तास चालतो. वेळ संपताच चर्चा संपते व प्रश्न अनिर्णित रहातो. या वेळी व अशाच अन्य प्रसंगी ज्या पक्षाला निर्णय विरुद्ध जाईल असे वाटते तो पक्ष अनेक वक्ते उभे करून चर्चा लांबविण्याचा प्रयत्न करतो व प्रश्न बोलून मोडून काढण्याचा प्रयत्न करतो. ( To talk out the motion ) वेळ संपेपर्यंत वक्ते संपत नाहीत व वेळ संपतांच सभा संपते, चर्चा संपते व प्रश्नही गळतो. वेळ संपण्यापूर्वी चचचदी आणावी तर पुरेशी चर्चा झालेली नसते व चर्चावंदी स्वीकारणे अध्यक्षास जड वाटते. तथापि सभा संपण्याची वेळ येतांच चर्चाबंदीची सूचना आली तर ती अध्यक्षाने स्वीकारून मतास घालावी व अधिक चर्चा हवी, मग ती केव्हां होईल तेव्हां होईल, कां निर्णय हवा हे ठरविण्याचे सभेवर सोंपवावे. चर्चाबंदी पास झाल्यास मुख्य प्रश्न मतास घालावा; नापास झाल्यास सभेने आपणहून प्रश्नाचा निकाल पुढे ढकलला अगर प्रश्नच विफल केला असे होईल. अध्यक्षावर दोष येणार नाहीं व नियमाचा दुरुपयोग करण्याची संधि त्याने दिली असेही होणार नाहीं. | पुष्कळ वेळां सभेपुढील प्रश्नावर अनेक उपसूचना येतात अशा वेळी चर्चाबंदीची सरळ सूचना न करतां ठरावांतील अगर विशिष्ट उपसूचनेतील कांहीं भाग ताबडतोब मतास घालावा अशीही सूचना मांडतां येते. त्यामुळे तेवढा भाग पास झाल्यास अनेक उपसूचना गळून पडतात, बाद होतात. म्हणजे सभेने घेतलेल्या निर्णयामुळे त्यांचा विचारच करता येत नाही. * शहरसधारणा-समिति १० जणांची असावी व त्यांत अमुक असावेत' हा ठराव याला ५ ची असावी, १५ ची असावी २० ची असावी अशा अनेक उपसूचना व प्रत्येक कोण असावेत यांची यादी, तसेच मूळ ठरावांतील १० कोण कोण