पान:सभाशास्त्र.pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

समाशास्त्र १५६ ރރރރރރރރރރރރ. ज्यादा मत देऊन सभेला पुन्हा चर्चा करण्याची संधि द्यावी व हा संकेत इष्ट आहे. निम्में सभागृह चर्चा चालवावी असे म्हणत असतां आपल्या एकट्याचे ज्यादा मताने ती बंद करून चर्चास्वातंत्र्यावर आक्रमण करू नये. - चर्चावंदीची सूचना पास होऊन प्रश्न मतास घातल्यानंतर त्याला आनुषंगिक असलेले प्रश्न पण चर्चेशिवाय व पुन्हा चर्चाबंदीचे सूचनेशिवाय मतास घालता येतात. अर्थात् हा अधिकार अध्यक्षाला आहे व तशी मागणी केली व ती अध्यक्षास योग्य वाटल्यास अध्यक्ष आनुषंगिक प्रश्न एकदम मतास घालतो. * शहरसुधारणा-समिति नेमावी व तीत असक गृहस्थ असावेत. अमक्या दिवसांत तिने खालील गोष्टीवर रिपोर्ट करावा' हा ठराव व कोण गृहस्थ असावेत, कोणते विषय असावेत याबद्दल, अनेक उपसूचना सभेपुढे असून बराच काल चर्चा झाल्यानंतर सभेनें चर्चाबंदीची सुचना पास केली. चर्चेच्या सोयीसाठी अध्यक्षाने प्रथम जरी मुख्य ठराव व सर्व उपसूचना मांडू दिल्या तरी मतासाठी प्रथम समिति नेमावी, एवढाच भाग घालण्यांत येईल असे जाहीर केलेले असले म्हणजे तेवढाच भाग प्रथम मतासः घातला जातो. तो भाग पास झाला म्हणजे बाकीच्या उपसूचनेवर पुन्हा चर्चा होऊ देणे किंवा न देणे हे अध्यक्षाचे अधिकारांत आहे. चर्चाबंदीची सुचना * समिति नेसावी एवढ्याच प्रश्नाला जरी दिसत असली तरी वस्तुतः त्याला व तदनुषंगिक सर्व प्रश्नांना ती आहे. नुसती समिति नेमावी हा प्रश्न सभेने मान्य करून भागत नाही. विषय पुरा होत नाही म्हणून समितीत कोण असावे, कोणते विषय असावेत ह्या बाबतींत सभेपुढे आलेले प्रश्नही मतास घातले पाहिजेत म्हणजे मुख्य प्रश्नावरील निर्णय परिपूर्ण होतो. हे आनुषंगिक प्रश्न ताबडतोब मतास घालावेत अशी मागणी करण्याचा हक्क चचबिंदीची सुचना पास झाल्यानंतर उपस्थित होतो. एकदम मतास टाकावेत का थोडी चर्चा होऊ द्यावी हे ठरविण्याचा अधिकार वर सांगितल्या प्रमाणे अध्यक्षास आहे व योग्य प्रसंगी त्याने कालहरण न व्हावे व झालेल्या निर्णयाला पूर्णता यावी म्हणून एकदम मतास घालणे इष्ट असते. चर्चाबंदीची सूचना पास झाली व मुख्य प्रश्न मतास टाकून झाला व सभाकाळ संपत असेल तर आनुषंगिक प्रश्न ताबडतोब मतास टाकावेत अशी मागणी करता येते. आनुषंगिक प्रश्नावर चर्चा वरील परिस्थितींत चालू दिल्यास सभेचा मुख्य प्रश्नावरील निर्णय निरर्थक ठरतो. अशा प्रसंगी आनुषंगिक प्रश्न ताबड