पान:सभाशास्त्र.pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र १५४ •••••••• असली पाहिजे. भाषणस्वातंत्र्य व चर्चास्वातंत्र्य म्हणजे वाटेल तितकें व वाटेल तेवढा वेळ वाटेल त्याने बोलावे असा अर्थ केल्यास अनर्थ होईल, म्हणून सभाकाल निश्चित करावा लागतो. व्यक्तिशः भाषणकाल मर्यादित करावा लागतो. एका विषयावर एकाला एकदांच बोलतां येईल अशी व्यवस्था करावी लागते, इतके करूनही भागत नाहीं. स्थानिक स्वराज्यसंस्थांतून ५० वर सभासद असतात. विधिमंडळांतून शेकडोंने असतात. या देशांतील प्रांतिक मंडळांतूनसुद्धा एक दोन अपवाद सोडून १५० वर प्रत्येक सभासद आहेत. मध्यवर्ति विधिमंडळांत १४५ आहेत. ब्रिटिश पार्लमेंटचे कॉमन्स सभेमध्ये ६१५ आहेत. ही झाली विविसिद्ध संस्थांची स्थिति, अन्य संस्थांच्या महामंडळांच्या (Ganeral body ) सभांनांही मोठ्या संख्येने सभासद हजर असतात. तात्पर्य उपस्थित सर्व सभासदांनी सर्व विषयावर एकदां जरी बोलण्याचे ठरविलें तरी सभा किती तरी लांबेल. ही लांबण थांबावी व विषयाची चर्चा तर युक्त व यथासांग व्हावी या दोन्ही गोष्टी योग्य वेळी चर्चाबंदी केल्याने साधतात. युक्त व यथासांग चर्चा म्हणजे विषयाचे, सभेपुढील प्रश्नाचे. सर्व दृष्टींनी योग्य प्रमाणांत विवेचन होणे होय, तेच ते त्या वक्त्यानें अगर अन्य वक्त्याने बोलणे योग्य नाहीं. सभागृहांत सभेपुढील प्रश्नावर सामान्यतः कोण कोणत्या मतप्रणालीचे आहेत याची कल्पना अध्यक्षास असते. म्हणून प्रत्येक मतप्रणालीचा अगर सभागृहांतील विद्यमान असलेल्या पक्षांतील एक एक वा तरी बोलून गेला असला म्हणजे प्रश्नाच्या सर्व बाजू सभेपुढे आल्या असं होते. चर्वितचर्वणाने, शिळ्या कोटिक्रमानें, अनाठायीं केलेल्या वक्तृत्वाने, लांबलचक भाषणांनी सभा जेरीस आली म्हणजे चर्चा पुरी झाली असे नाहीं. ऐकणा-यांच्याही सहनशीलतेला मर्यादा आहे. शिसारी येईपर्यंत चर्चा चालू देणे योग्य नाहीं. सभेमधील कोणत्याही अल्पसंख्याक सभासदांना अगर पक्षाला आपली बाजू मांडण्यास योग्य संधिः मिळाली नाही असे म्हणण्यास वाव राहता कामा नये, इतकी काळजी अध्यक्षाने घेतली म्हणजे पुरे आहे. प्रत्येक सभासदाला बोलण्यास मिळाले पाहिजे असा हट्ट अगर आग्रह गर आहे. अल्पमतवाल्यांना अन्याय होणार नाही अशी दक्षता ठेवून अध्यक्षान चचौबंदी होऊ द्यावी. तसेच या चर्चाबंदीच्या नियमांचा दुरुपयोग करून अजीबात चर्चा न होऊ देण्याचा कोणी प्रयत्न करील तर तोही अध्यक्षाने हाणून